ETV Bharat / briefs

पायातून रक्त वाहत असतानाही वॉटसन करत होता फलंदाजी, आता जग करतय सलाम

या सामन्यात वॉटसनने ५९ चेंडूत ८० धावंची खेळी केली.

शेन वॉटसन
author img

By

Published : May 14, 2019, 12:19 PM IST

हैदराबाद - चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईकडून पराभव झाला. मात्र असे असतानाही शेन वॉटसनने मात्र, साऱ्यांचीच मने जिंकली आहे. त्याच्या घुडघ्यातून रक्त येत असतानही तो फलंदाजी करत होता. सोशल मीडियावर त्याच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.

हरभजन सिंगने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट टाकून ही माहिती दिली आहे. त्या फोटोत वॉटसनच्या घुडघ्यातून रक्त येत असल्याचे दिसून येत आहे. सामन्यानंतर वॉटसनला सहा टाके पडले आहेत. वॉटसनने धावबाद होण्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सूर मारताना त्याच्या पायाला जखम झाली होती.

या सामन्यात वॉटसनने ५९ चेंडूत ८० धावंची खेळी केली. तो चेन्नईला सामना जिंकून देण्यासाठी जीव तोडून मेहनत करत होता. शेवटी तो धावबाद झाला आणि चेन्नईला विजयासाठी एक धाव कमी पडली. लसिथ मलिंगाच्या अखेरच्या चेंडूने चेन्नईचा विजयी घास हिरावून घेतला. आयपीएलचा किंग जरी मुंबई ठरला असला तरी जखमी शेन वॉटसनचे सर्वेत्र कौतुक होत आहे.

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.