ETV Bharat / briefs

रोज अडीच हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करा - पालकमंत्री - यवतमाळ पालकमंत्री संजय राठोड न्यूज

जिल्ह्यातील जवळपास 25 हजार 148 शेतकऱ्यांचा 7 लाख 54 हजार 400 क्विंटल कापूस खरेदी करायचा आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 44 पैकी 30 जिनिंग सुरू आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी कडक धोरण अवलंबल्यामुळे पुढील दोन दिवसात पाच जिनिंग सुरू होणार आहे. यात वणी येथील दोन, राळेगाव येथील दोन आणि एक पुसद येथील जिनिंगचा समावेश आहे. एका सर्व जिनिंगवर एका दिवसात किमान 80 गाड्या खरेदीसाठी नेण्यात येणार आहे.

यवतमाळ न्यूज
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीचे दृष्य
author img

By

Published : Jun 2, 2020, 8:40 AM IST

यवतमाळ - शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळावा, त्याच्या हातात दोन पैसे जास्त यावे, या उद्देशाने शासन हमी भावाप्रमाणे शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करते. मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस घरातच असल्याचे निदर्शनास आल्यामुळे हा कापूस त्वरित खरेदी करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. त्यानुसार आता रोज अडीच हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या वर्षीचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. मात्र, अजूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस घरात आहे. यावर नियोजन करत जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सहकार विभाग, सीसीआय, कॉटन फेडरेशनच्या सर्व अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली होती. तसेच जिनिंग मालकांसोबतही चर्चा केली. त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस पुढील दहा दिवसांत खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून यावर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष लक्ष असणार आहे.

जिल्ह्यातील जवळपास 25 हजार 148 शेतकऱ्यांचा 7 लाख 54 हजार 400 क्विंटल कापूस खरेदी करायचा आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 44 पैकी 30 जिनिंग सुरू आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी कडक धोरण अवलंबल्यामुळे पुढील दोन दिवसात आणखी पाच जिनिंग सुरू होणार आहे. यात वणी येथील दोन, राळेगाव येथील दोन आणि एक पुसद येथील जिनिंगचा समावेश आहे. एका सर्व जिनिंगवर एका दिवसात किमान 80 गाड्या खरेदीसाठी नेण्यात येणार आहेत. एकाच दिवशी 23 हजार 852 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यात सीसीआयच्या वतीने 611 शेतकऱ्यांचा 13 हजार 639 क्विंटल कापूस, कॉटन फेडरेशनतर्फे 402 शेतकऱ्यांचा 10 हजार 213 क्विंटल कापूस, असा एकूण 1 हजार 13 शेतकऱ्यांकडून 23 हजार 852 क्विंटल कापूस खरेदी केला.

जिल्ह्यातील 44 पैकी 35 जिनिंगवर कापूस खरेदी करण्यात येईल. प्रत्येक जिनिंगवर रोज किमान 80 गाड्या गेल्याच पाहिजे, यापेक्षा जास्त नेण्यास हरकत नाही, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले आहेत. तसेच बोगस नोंदणी किंवा सातबाराच्या उताऱ्यावर असलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त कापूस विकला गेल्याचे निदर्शनास आल्यास तालुकास्तरीय समितीमार्फत संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.