मुंबई - पंजाब संघाचा कर्णधार आर. अश्विनची राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू जोस बटलरला मंकड पद्धतीने बाद केल्यामुळे खिल्ली उडवली जात आहे. एवढेच नाही, तर क्रिकेट समीक्षक आणि माजी क्रिकेटर अश्विनीच्या अखिलाडू वृत्तीवर ताशेरे ओढत आहेत. नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गौतम गंभीरनेही अश्विनबद्दल एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात गौप्यस्फोट केला आहे.
गौतम गंभीर आणि आर. अश्विन भारत 'अ' संघाकडून खेळत होते. तेव्हा गौतमने आर. अश्विनला त्याची अंतर्वस्त्रे आणि मोजे फ्रीजमध्ये ठेवताना पाहिल्याचा खळबळ जनक खुलासा केला. याबाबत गौतमने अश्विनला विचारले असता, मी दबावात आहे, तुम्हाला समजणार नाही, असे तो म्हणाला.
अश्विनवर तेव्हा चांगली कामगिरी करण्याचा दबाव होता. त्यामुळेच त्याने कपडे कपाटात ठेवण्याऐवजी फ्रिजमध्ये ठेवली होती असेही गंभीरने सांगितले आहे. आताही त्याच्यावर दबाव असेल आणि बटलरला कोणताही इशारा न देता त्याने बाद केले असेल, असे गंभीरने म्हटले आहे.