अकोला - जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालात आज सकाळी १४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, २८ अहवालातून १४ अहवाल निगेटिव्ह आणि १४ पॉझिटिव्ह आले आहेत. गुरुवारी ४६ अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालात सात पुरुष आणि सात महिला आहेत. यातील रुग्णांपैकी दोन जण गुलजारपुरा, दोन सिंधी कॅम्प, दोन हैदरपुरा तर उर्वरित गोरक्षण, गवळीपूरा, पातूर, बिर्ला कॉलनी, अकोट फैल, बैदपुरा, जुने शहर, मोहतामिल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. कोविड रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाच प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे.
*प्राप्त अहवाल-२८
*पॉझिटीव्ह-१४
*निगेटिव्ह-१४
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ७२६
मृत- ३४ (३३+१)
डिस्चार्ज- ४८८
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२०४