ETV Bharat / briefs

अहमदनगर: शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड कोरोनाबाधित, कुटुंबातील 4 सदस्यही पॉझिटिव्ह - former MLA anil rathod Corona positive

आमदार अनिल राठोड यांना फ्ल्यूसदृश लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी रविवारी स्वॅब दिले. त्यांचा अहवाल काल रात्री पाॅझिटिव्ह आला. तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचेही स्वॅब घेण्यात आले असून, त्यांची पत्नी, मुलगा, सून हेही पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Former MLA anil rathod
Former MLA anil rathod
author img

By

Published : Jul 28, 2020, 9:02 PM IST

अहमदनगर- शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांचे कोरोनाविषयक तपासणीचे अहवाल पाॅझिटिव्ह आले असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील चाैघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

राठोड यांना फ्ल्यूसदृश लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी रविवारी स्वॅब दिले. त्यांचा अहवाल काल रात्री पाॅझिटिव्ह आला. तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचेही स्वॅब घेण्यात आले असून, त्यांची पत्नी, मुलगा, सून हेही पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर रात्रीच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राठोड यांच्या चाहत्यांनी ते लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे. सोशल मीडियावर तसे संदेश व्हायरल होत आहेत. "अनिल भैय्या, विक्रम भैय्या, तुम्ही सही सलामत यातून बाहेर पडणार आहात आणि आधीपेक्षाही नव्या जोमाने कामाची सुरुवात करणार आहात. तुम्ही निःस्वार्थी भावनेने केलेल्या कामाची पावती तुम्हाला मिळणार आहे. काळजी करू नका, गोरगरिबांच्या सेवेचा आशिर्वाद तुमच्या पाठिशी आहे." अशी पोस्ट नितीन कोतकर यांनी फेसबुकवर टाकून त्यांना धीर दिला आहे. दरम्यान, कोणीही घाबरू नका. नागरिकांनी आपापल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. आम्ही लवकरच बरे होऊन नगरकरांच्या सेवेत येवू. अशी पोस्ट फेसबूकवर विक्रम राठोड यांनी टाकली आहे.

चितळेरोड परिसरात गर्दी सुरूच

शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या चितळेरोड परिसरात मागील काही दिवस पूर्णपणे बंद होते. आता मात्र गर्दीने हा रस्ता भरला आहे. याच रस्त्यावर राठोड यांचे शिवसेनेचे कार्यालय 'शिवालय' आहे. भाजीबाजार बंद केला असला, तरी इतर दुकाने या परिसरात सुरू आहेत. त्यामुळे प्रशासनाने या भागाला पुन्हा सील करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सध्या शहरातील अनेक भाग कोरोनामुळे सील करण्यात आले आहेत. शहराजवळील उपनगरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत असून, रोज आकडेवारी वाढताना दिसून येत आहे. सारसनगर, केडगाव आदी भागातील रुग्ण कमी होताना दिसत नाही. तोफखाना, नालेगाव, बालिकाश्रम रोडवरील रुग्णांचे प्रमाण कमी झाले असले, तरी तेथील नागरिक काळजी घेताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाने कठोरपणे निर्णय घेवून नियमांची अंमलबजावणी करण्यास भाग पाडावे, अशी मागणी होत आहे.

शहराबरोबरच शेजारील गावांमध्ये रुग्ण सापडू लागले आहेत. नागरिक माल खरेदीसाठी शहरात येत असतात, त्यातून त्यांना कोरोनाची बाधा होत असल्याचे दिसून आले आहे. नगर तालुक्यातील अनेक गावे सध्या बंद आहे. बुऱ्हाणनगर, या मोठ्या गावातील व्यवहारही कोरोनामुळे ठप्प झालेले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.