ETV Bharat / briefs

शेतकऱ्यांनी बियाणे, खते, किटकनाशके अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी; खरेदीची पावतीही घ्यावी....!

कृषि निविष्ठा विषयी असलेल्या अडचणी तक्रारी सोडवण्यासाठी मार्गदर्शनासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 वर संपर्क साधावा, असे आवाहन धर्माबाद तालुक्याच्या कृषि अधिकाऱ्यांनी यांनी केले आहे.

NANDED NEWS
NANDED
author img

By

Published : Jun 5, 2020, 9:36 PM IST

नांदेड - अधिकृत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि किटकनाशके खरेदी करुन न विसरता पावती घ्यावी, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी माधुरी उदावंत आणि धर्माबाद पंचायत समितीचे कृषि अधिकारी विश्वास अधापुरे यांनी केले आहे.

दरम्यान, बनावट व भेसळ युक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडूनच पावतीसह खरेदी करा. खरेदी केलेल्या बियाण्याचे वेस्टन किंवा पिशवी, टॅग खरेदीची पावती आणि त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्याचे पाकीट सीलबंद तथा मोहर बंद असल्याची खात्री करा.

बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरील अंतिम मुदत पाहून घ्या. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा. किटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करा. कृषि निविष्ठा विषयी असलेल्या अडचणी तक्रारी सोडवण्यासाठी मार्गदर्शनासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 वर संपर्क साधावा, असे आवाहन धर्माबाद तालुक्याच्या कृषि अधिकाऱ्यांनी यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.