ETV Bharat / briefs

सोयाबीन उगवले नाही म्हणून शेतकरी चढला पाण्याच्या टाकीवर, कंपनीवर कारवाईची मागणी - शोले स्टाईल आंदोलन टाकळी खोजबोळ

पोलिसांनी घटनास्थळ गाठून शेतकऱ्याची समजूत काढली. परंतु, तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते देखील शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहून त्यांनीही आंदोलनाला समर्थन दिले. शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.

Sholey style protest akola
Sholey style protest akola
author img

By

Published : Jun 29, 2020, 10:56 PM IST

अकोला- सोयाबीन उगवले नाही म्हणून टाकळी खोजबोळ या गावातील शेतकऱ्याने गावात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. हे आंदोलन पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. यावेळी पोलिसांना बोलावण्यात आले होते. कालांतराने शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केले.

अकोल्यातील टाकळी खोजबोळ गावातील शेतकरी महादेवराव वानखडे यांनी 15 एकरात पेरलेले सोयाबीन बी उगवलेच नाही. त्यामुळे त्यांनी गावात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. तसेच प्रशासनाने संबंधित कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. या आंदोलनाची माहिती तहसीलदार आणि पोलिसांना देण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.