ओव्हल - विश्वकरंडकाच्या तयारीपूर्वी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. यातील पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला आहे. पाकिस्तानच्या डावातील १९ व्या षटकात पावसाने अचानक हजेरी लावली. सामना संपेपर्यत पाऊस सुरूच राहिल्याने अखेर हा सामना पंचानी रद्द केला.
पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थक ठरवत धारदार गोलंदाजी केली. सलामीचा फलंदाज फखर जमान याला ३ धावावर माघारी धाडले. वंडर किड जोफ्रा आर्चरने त्याला बाद केले. त्यानंतर बाबर आझमही १६ धावां काढून माघारी परतला. पाकिस्तानने १९ षटकांपर्यंत २ बाद ८० धावा केल्या होत्या.
पाकिस्तानकडून इमाम-उल-हल ४२ तर हॅरिस सोहेल १४ धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि लियाम प्लंकेट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या मालिकेतील दुसरा सामना साउथॅम्पटन येथील मैदानावर ११ मे रोजी होणार आहे.