ETV Bharat / briefs

सातारा जिल्ह्यातील 29 पैकी 11 कोरोनाबाधितांचे मृत्यू उपचारांपूर्वीच; मृत्यूदरही ४ टक्क्यांनी वाढला

जिल्ह्यात 689 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी 419 रूग्ण बरे झाले आहेत. तर सध्या 240 रूग्ण हे उपचार घेत आहेत. तर 29 मृत्युपैकी 10 पेक्षा कमी वयाच्या तसेच 11 ते 40 वयोगटातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यु झालेल्या 41 ते 60 वयोगटातील 11 तर 61 ते 80 वयोगटातील 15 आणि 80 पेक्षा जास्त वयाच्या 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

satara corona news
satara corona news
author img

By

Published : Jun 12, 2020, 3:11 PM IST

सातारा - जिल्ह्यातील 29 पैकी 11 कोरोना रूग्णांचा मृत्यू घरी, रस्त्यात किंवा उपचारा घेण्यापुर्वीच झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आाहे. सध्या जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण हे 4 टक्के इतके अधिक आहे. बाधितांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून आपल्या मुळ गावी आलेल्या नागरिकांनी स्वत:हून आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

यावेळी सातारा जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा सादर करून आजवरच्या आकडेवारीचे विश्लेषण सिंह यांनी मांडले. सिंह म्हणाले की, जिल्ह्यात 689 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी 419 रूग्ण बरे झाले आहेत. तर सध्या 240 रूग्ण हे उपचार घेत आहेत. तर 29 मृत्यूपैकी 10 पेक्षा कमी वयाच्या तसेच 11 ते 40 वयोगटातील एकाही रुग्णाचा मृत्यु झाला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 41 ते 60 वयोगटातील 11 तर 61 ते 80 वयोगटातील 15 आणि 80 पेक्षा जास्त वयाच्या 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील 29 पैकी 27 जणांना उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्रदयविकार तर काहींना यातील दोन्ही व्याधी होत्या. 29 पैकी 11 रुग्णांचा मृत्यु घरी, रस्त्यात किंवा उपचारा घेण्यापूर्वीच झाला आहे. अजुनही अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत अथवा पालिका कर्मचाऱ्यांना लोक बाहेरुन आलेल्या लोकांबाबत दिसणाऱ्या लक्षणांची माहिती देत नाहीत, असे दिसते. काही ठिकाणी यंत्रणा पोहोचण्यात कमी पडत असेलही तरी मुंबई व इतर जिल्ह्यातून आलेल्या लोकांनी सर्वेक्षणासाठी आलेल्या यंत्रणेशी अथवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. जेणे करून त्यांना वेळेत उपचार मिळून ते बरे होतील. जिल्ह्यात प्रवास करून आलेले, व्याधीग्रस्त लोक आहेत अशांची घरातील लोकांनी काळजी घ्यावी. त्यांना ताप, खोकला, घसा दुखणे, धाप लागणे अशी लक्षणे दिसल्यास आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधल्यास उपचाराअभावी कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रकार टाळता येतील, असेही जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.