ETV Bharat / briefs

सिद्धूंना निवडणूक आयोगाची नोटीस, 'हे' आहे कारण - notice

मुस्लीम समाजाने आपली मते विभाजित होऊ देऊ नये आणि भाजपविरोधात एकत्रित येऊन मतदान करावे, असे सिद्धू यांनी बिहारमधील कटिहार येथील रॅलीमध्ये १६ एप्रिलला म्हटले होते.

नवज्योत सिंग सिद्धू
author img

By

Published : Apr 21, 2019, 11:08 AM IST

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने काँग्रेसचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांना नोटीस बजावली आहे. सिद्धू यांनी बिहारमधील कटिहार येथील रॅलीमध्ये मुस्लीम समाजाने आपली मते विभाजित होऊ देऊ नयेत, असे आवाहन केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे निवडणूक आयोगाने २४ तासांत स्पष्टीकरण मागितले आहे. स्पष्टीकरण न दिल्यास पुढील निर्णय आयोगाद्वारे कोणत्याही सूचनेशिवाय घेण्यात येईल, अशी ताकीदही आयोगाने सिद्धू यांना दिली आहे.

मुस्लीम समाजाने आपली मते विभाजित होऊ देऊ नये आणि भाजपविरोधात एकत्रित येऊन मतदान करावे, असे सिद्धू यांनी १६ एप्रिलला म्हटले होते.

'मी मुस्लीम बांधवांना इशारा देऊ इच्छितो, की भाजप तुमच्यात फूट पाडत आहे. असदुद्दीन ओवेसींसारख्या लोकांना येथे आणून ते तुमच्या मतांचे विभाजन करत आहेत. तुम्ही एकत्र येऊन भाजपविरोधात मतदान केले तरच मोदींना संपवता येईल,' असे सिद्धू यांनी म्हटले होते. सोबतच क्रिकेटचा दाखला देत 'हा एक षटकार ठरेल. तो मोदींना उचलून सीमापार करेल,' असेही सिद्धू म्हणाले होते.

Intro:Body:

DUmmy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.