मुंबई - राज्यातील रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे २६ दिवसांवर गेला आहे. तर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज(गुरुवार) १ हजार ६७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६० हजार ८३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३ हजार ७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार ९०१ रुग्णांवर (अॅक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात सध्या ५८ शासकीय आणि ४३ खासगी अशा एकूण १०१ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख १७ हजार ६८३ नमुन्यांपैकी १ लाख २० हजार ५०४ नमुने पॉझिटिव्ह (१६.९३ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८१ हजार ६५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात २२०३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ९२ हजार १४१ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७४० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात १०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे:
ठाणे- ९९ (मुंबई ६७, भिवंडी २७, ठाणे ४, वसई-विरार १), नागपूर-१ (नागपूर मनपा १).
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६६ पुरुष तर ३४ महिला आहेत.
आज नोंद झालेल्या १०० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४५ रुग्ण आहेत तर ४६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५७५१ झाली आहे.
*राज्यातील जिल्हानिहाय अॅक्टीव्ह रुग्णांचा तपशील*
*मुंबई:* बाधीत रुग्ण- (६२,८७५), बरे झालेले रुग्ण- (३१,८५६), मृत्यू- (३३११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), अॅक्टीव्ह रुग्ण- (२७,७००)
*ठाणे:* बाधीत रुग्ण- (२१,०९३), बरे झालेले रुग्ण- (८९८८), मृत्यू- (६७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), अॅक्टीव्ह रुग्ण- (११,४३१)
*पालघर:* बाधीत रुग्ण- (२८५३), बरे झालेले रुग्ण- (९६०), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (१८१०)
*रायगड:* बाधीत रुग्ण- (२१६६), बरे झालेले रुग्ण- (१४१२), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), अॅक्टीव्ह रुग्ण- (६६६)
*रत्नागिरी:* बाधीत रुग्ण- (४७२), बरे झालेले रुग्ण- (३१२), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (१४२)
*सिंधुदुर्ग:* बाधीत रुग्ण- (१६१), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (५९)
*पुणे:* बाधीत रुग्ण- (१४,०००), बरे झालेले रुग्ण- (७५८५), मृत्यू- (६१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (५८०५)
*सातारा:* बाधीत रुग्ण- (७९१), बरे झालेले रुग्ण- (५०५), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), अॅक्टीव्ह रुग्ण- (२५१)
*सांगली:* बाधीत रुग्ण- (२७३), बरे झालेले रुग्ण- (१४५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (११७)
*कोल्हापूर:* बाधीत रुग्ण- (७३६), बरे झालेले रुग्ण- (६४६), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (८२)
*सोलापूर:* बाधीत रुग्ण- (२०६१), बरे झालेले रुग्ण- (८८०), मृत्यू- (१८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (९९७)
*नाशिक:* बाधीत रुग्ण- (२३०६), बरे झालेले रुग्ण- (१३६८), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (८०४)
*अहमदनगर:* बाधीत रुग्ण- (२५५), बरे झालेले रुग्ण- (१९८), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (४५)
*जळगाव:* बाधीत रुग्ण- (२०३१), बरे झालेले रुग्ण- (९२९), मृत्यू- (१७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (९२६)
*नंदूरबार:* बाधीत रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (३३)
*धुळे:* बाधीत रुग्ण- (४६६), बरे झालेले रुग्ण- (२७८), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), अॅक्टीव्ह रुग्ण- (१३६)
*औरंगाबाद:* बाधीत रुग्ण- (३०६४), बरे झालेले रुग्ण- (१६७६), मृत्यू- (१६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (१२२०)
*जालना:* बाधीत रुग्ण- (३१९), बरे झालेले रुग्ण- (२०१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (१०६)
*बीड:* बाधीत रुग्ण- (८२), बरे झालेले रुग्ण- (५६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),अॅक्टीव्ह रुग्ण- (२४)
*लातूर:* बाधीत रुग्ण- (२०१), बरे झालेले रुग्ण- (१२७), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (६१)
*परभणी:* बाधीत रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (६)
*हिंगोली:* बाधीत रुग्ण- (२४३), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (४७)
*नांदेड:* बाधीत रुग्ण- (२६६), बरे झालेले रुग्ण (१६४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (९०)
*उस्मानाबाद:* बाधीत रुग्ण- (१६१), बरे झालेले रुग्ण- (१२३), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (३०)
*अमरावती:* बाधीत रुग्ण- (३८६), बरे झालेले रुग्ण- (२७३), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (८६)
*अकोला:* बाधीत रुग्ण- (११२६), बरे झालेले रुग्ण- (६७४), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), अॅक्टीव्ह रुग्ण- (३९५)
*वाशिम:* बाधीत रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (५४)
*बुलढाणा:* बाधीत रुग्ण- (१४९), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (५३)
*यवतमाळ:* बाधीत रुग्ण- (२१०), बरे झालेले रुग्ण- (१४२), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (६३)
*नागपूर:* बाधीत रुग्ण- (११५४), बरे झालेले रुग्ण- (६५१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (४९०)
*वर्धा:* बाधीत रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (५)
*भंडारा:* बाधीत रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (१७)
*गोंदिया:* बाधीत रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (३२)
*चंद्रपूर:* बाधीत रुग्ण- (५७), बरे झालेले रुग्ण- (३०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (२७)
*गडचिरोली:* बाधीत रुग्ण- (५१), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (९)
*इतर राज्ये:* बाधीत रुग्ण- (१०२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), अॅक्टीव्ह रुग्ण- (८२)
*एकूण: बाधीत रुग्ण-(१,२०,५०४), बरे झालेले रुग्ण- (६०,८३८), मृत्यू- (५७५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१४),अॅक्टीव्ह रुग्ण-(५३,९०१)*
(टीप- आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १७१ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर .पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )
९ मार्च २०२० रोजी राज्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला. त्यानंतर मागील सुमारे ३ महिन्याच्या काळात राज्यातील रुग्ण वाढीचा वेग ( साप्ताहिक सरासरी) क्रमशः कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील कोविड १९ प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होते आहे.
३१ मार्च: रुग्ण वाढ दराची साप्ताहिक सरासरी १२ टक्के, रुग्ण दुपटीचा कालावधी ३.५ दिवस
३० एप्रिल: रुग्ण वाढ दराची साप्ताहिक सरासरी ७ टक्के, रुग्ण दुपटीचा कालावधी १०.२ दिवस
३१ मे: रुग्ण वाढ दराची साप्ताहिक सरासरी ४ टक्के, रुग्ण दुपटीचा कालावधी २०.१ दिवस
१६ जून: रुग्ण वाढ दराची साप्ताहिक सरासरी ३ टक्के, रुग्ण दुपटीचा कालावधी २५.९ दिवस