बंगळुरू - चिन्नास्वामी स्टेडियम येथे सुरू झालेल्या आयपीएलच्या २० व्या सामन्यात दिल्लीने बंगळुरूचा ४ गडी राखून पराभव केला. कंगिसो रबाडा याच्या भेदक गोलंदाजीमुळे बंगळुरूचा संघ २० षटकात ८ बाद १४९ धावा करु शकला. १५० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीने ६ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले.
१५० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरूवात फारच खराब झाली. शिखर धवनला भोपळाही फोडता आला नाही. त्याला टिम साउथीने बाद केले. त्यानंतर पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यरने धमाका केला. पृथ्वी २८ तर श्रेयसने ६७ धावा केल्या. अय्यरने कर्णधाराला साजेशी अशी खेळी केली. त्याने ५० चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६७ धावा कुटल्या. पंतने १८ धावांचे योगदान दिले. बंगळुरूकडून नवदीप सैनीने २ तर पवन नेगीने घेतला १ बळी घेतला.
दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम बंगळुरूच्या संघाला फलंदाजीस पाचारण केले. बंगळुरूच्या फलंदाजांनी या सामन्यातही निराशा केली. विराट कोहली (४१), मोईन अली (३२) धावा केल्या. अक्षदीप नाथ यांनी १९ धावांचे योगदान दिले. कंगिसो रबाडाने १९ धावात ४ बळी घेतले. दिल्लीकडून ख्रिस मॉरिसने २, अक्षर पटेल १, संदीप लामिछाने १ बळी टिपले.