ETV Bharat / briefs

दिल्लीचा कोलकातावर ७ गडी राखून दणदणीत विजय

शिखरने कोलकाताच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्याने ६३ चेंडूत ९७ धावा केल्या. त्यात ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

दिल्लीचा कोलकातावर ७ गडी राखून दणदणीत विजय
author img

By

Published : Apr 12, 2019, 8:17 PM IST

Updated : Apr 13, 2019, 12:14 AM IST

कोलकाता - स्टायलिश फलंदाज शिखर धवनच्या शानदार नाबाद ९७ धावांच्या जोरावर दिल्लीने कोलकाताला ७ गडी राखून धूळ चारली. शुभमन गिल ६५ तर आंद्रे रसेलच्या ४५ धावांच्या जोरावर कोलकाताने दिल्लीपुढे विजयासाठी १७९ धावांचे आव्हान दिले आहे. दिल्लीने हे आव्हान ३ गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.

१७९ धावांचे आव्हान मैदानात घेऊन उतरलेल्या दिल्लीच्या संघाने ताबडतोब सुरुवात केली. पृथ्वी शॉ १४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर ऋषभ पंतने ४६ धावा कुटल्या. त्यात २ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. शिखरने कोलकाताच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्याने ६३ चेंडूत ९७ धावा केल्या. त्यात ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. कॉलिन इग्राम हा १४ धावांवर नाबाद परतला. कोलकाताकडून प्रसिध्द कृष्णा, आंद्रे रसेल, नीतिश राणा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यचा निर्णय घेतला होता. कोलकाताने निर्धारित २० षटकात ७ बाद १७८ धावांपर्यंत मजल मारली. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. जो शून्यावर माघारी परतला. त्यानंतर शुभमन गिलने आक्रमक खेळी करण्यास सुरूवातकेली. त्याने ३९ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकार ठोकत ६५ धावा कुटल्या. आंद्रे रसेलने २१ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. रॉबिन उथप्पा २८ , नितीश राणा ११ पीयुष चावला १४, दिनेश कार्तिक २ धावा काढून माघारी परतले.

दिल्लीकडून ख्रिस मॉरिसने ३८ धावात २ कंगिसो रबाडा ४२ धावा देत २ गडी बाद केले. किमो पॉल यानेही सुरेख गोलंदाजी करत ४६ धावा देऊन २ गडी बाद केले.

Intro:Body:

SPO 04

Conclusion:
Last Updated : Apr 13, 2019, 12:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.