ETV Bharat / briefs

सीपीएस निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनवाढीची घोषणा हवेतच, प्रस्ताव धूळ खात पडून - Resident Doctor Live Update

सीपीएस निवासी डॉक्टर दुर्लक्षित असून त्यांना कोणतीही वाढ मिळालेली नव्हती. त्यामुळे मेमध्ये त्यांनी आंदोलन करत महापौर किशोरी पेडणेकर यांची 27 मे ला भेट घेतली होती. या बैठकीत त्यांची मागणी मान्य करत त्यांना कायमस्वरूपी 54 हजार रुपये असे विद्यावेतन देण्याची घोषणा केली. पण याला दोन आठवडे उलटून गेले तरी ही मागणी प्रत्यक्षात आलेली नसल्याचे सीपीएस निवासी डॉक्टरांनी सांगितले आहे. 

सीपीएस निवासी डॉक्टर विद्यावेतनवाढ
सीपीएस निवासी डॉक्टर विद्यावेतनवाढ
author img

By

Published : Jun 12, 2020, 2:36 PM IST

मुंबई - कोरोना लढाईत कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (सिपीएस) संलग्नित निवासी डॉक्टरही दिवसरात्र सेवा देत आहेत. त्यानुसार, इंटर्न-निवासी डॉक्टरांप्रमाणे या डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याची घोषणा मुंबई महापालिकेने केली होती. या घोषणेला 15 दिवस उलटून गेले तरी या संबंधीचा प्रस्ताव धूळ खात पडून आहे. तर, हे निवासी डॉक्टर अंतिम निर्णय कधी होतो याकडे डोळे लावून आहेत.

राज्यभरात अंदाजे 4 हजार सीपीएस निवासी डॉक्टर असून मुंबईत त्यांची संख्या 500 च्या घरात आहे. कूपर, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा, ट्रॉमा केअर अशा विविध रुग्णालयात हे निवासी डॉक्टर सेवा देत आहेत. सध्या हे सर्व कोविडसाठी काम करत आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणारे हे विद्यार्थी असताना त्यांना मार्ड निवासी डॉक्टरांच्या तुलनेत कमी विद्यावेतन मिळते. निवासी डॉक्टरांना 54 हजार रुपये मिळत असताना यांना केवळ 14 हजार 800 रुपये मिळतात. तर, आता कोविडसाठी काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांना 10 हजार रुपये अतिरिक्त वाढ पालिकेने दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे इंटर्न निवासी डॉक्टरांना अतिरिक्त 39 हजार रुपयांची वाढ कोविडच्या कामासाठी देण्यात आली आहे.

एकूणच सीपीएस निवासी डॉक्टर दुर्लक्षित असून त्यांना कोणतीही वाढ मिळालेली नव्हती. त्यामुळे मेमध्ये त्यांनी आंदोलन करत महापौर किशोरी पेडणेकर यांची 27 मे ला भेट घेतली होती. या बैठकीत त्यांची मागणी मान्य करत त्यांना कायमस्वरूपी 54 हजार रुपये असे विद्यावेतन देण्याची घोषणा केली.

आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही मागणी मान्य केल्याची माहिती दिली होती. पण याला दोन आठवडे उलटून गेले तरी ही मागणी प्रत्यक्षात आलेली नसल्याचे सीपीएस निवासी डॉक्टरांनी सांगितले आहे.

आम्ही गेले दोन आठवडे सातत्याने यासाठी पाठपुरावा करत आहोत. मात्र, यासंबंधीचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. प्रस्ताव मंजूर होईल असे केवळ कोरडे आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे सर्व सीपीएस निवासी डॉक्टरांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचेही एका सीपीएस निवासी डॉक्टरने सांगितले आहे. दरम्यान, या विषयाचा पालिकेकडे पाठपुरावा करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना विचारले असता, यासंबंधीचा प्रस्ताव आहे. त्याला एक-दोन दिवसांत मान्यता मिळेल, असे पालिकेकडून आपल्याला कळवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तेव्हा आता अंतिम निर्णय कधी होतो याकडेच हे निवासी डॉक्टर डोळे लावून बसले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.