ETV Bharat / briefs

हिंगोली : अंजनवाडीत क्वारंटाइन होण्यास नकार देणाऱ्या कुटुंबावर गुन्हा दाखल

कुटुंबातील सातही व्यक्तींना तालुका आरोग्य अधिकारी अविनाश गायकवाड, तलाठी शेळके, ग्रामसेवक योगेश ईपकलवार व गावातील दक्षता समितीच्या सदस्यांनी खूप वेळा सूचना, विनंत्या केल्या. मात्र या व्यक्तींनी त्याकडे दुर्लक्ष करून क्वारंटाईन होण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला होता.

Hingoli police
Hingoli police
author img

By

Published : Jul 16, 2020, 3:42 PM IST

हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन खूप सतर्क झालेले आहे. अशातच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एका कुटुंबातील व्यक्तींनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतः हून क्वारंटाइन होणे गरजेचे होते. मात्र तसे न केल्याने प्रशासनाच्या वतीने अनेकदा विनंत्या करण्यात आल्या, मात्र तरीही क्वारंटाइन न झाल्याने 7 जणांविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुष्‍पाबाई पुंजाजी घनसावंत वय 48), कांताबाई मेसाजी घनसावंत (वय 55), नारायण पुंजाजी घनसावंत (वय 19), संदेश दिलीप घनसावंत (वय 22), यशवंता कैलास घनसावंत (वय 22), सुरेश लक्ष्‍मण घनसावंत (वय 48), व दिशा प्रभाकर घनसावंत (वय 28) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण अंजनवाडी येथे 32 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे आरोग्य पथक ग्रामसेवक व तलाठी यांनी गावात धाव घेऊन पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण 21 व्यक्तींना शासकीय क्वारंटाइन करणे गरजेचे होते. त्यानुसार यात 8 पुरुष आणि 4 महिला असे एकूण 12 जण स्वतः हून औंढा नागनाथ येथील शासकीय सेंटरमध्ये भरती झाले होते. मात्र यापैकी संपर्कात आलेल्या 7 जणांनी क्वारंटाइन होण्यास नकार दिला व घरातच ठाण मांडले. त्यामुळे सदरील व्यक्तींना तालुका आरोग्य अधिकारी अविनाश गायकवाड, तलाठी शेळके, ग्रामसेवक योगेश ईपकलवार व गावातील दक्षता समितीच्या सदस्यांनी खूप वेळा सूचना, विनंत्या केल्या. मात्र या व्यक्तींनी त्याकडे दुर्लक्ष करून क्वारंटाइन होण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला होता. तसेच, सातही जणांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले, त्यामुळे ग्रामसेवक योगेश ईपकलवार यांच्या फिर्यादीवरून या सात जणांविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्ह्यात ही अशी तिसरी कारवाई आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, कोरोनाची लक्षणे असल्यास तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतः हून शासकीय क्वारंटाइन होण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या कारवाईने हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.