ETV Bharat / briefs

भाजप आमदाराच्या निकटवर्तीयाचा मृत्यू, हत्येचा संशय - उत्तर प्रदेश गुन्हे वार्ता

मृत मोनू अहलावत हे दौराळा येथील रहिवासी असून ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित होते. मोनू अहलावत हे भाजप आमदार संगीत सोम यांचे निकटवर्तीय होते, जे सरधना मतदारसंघाचे आमदार आहेत.

national crime news
national crime news
author img

By

Published : Jun 13, 2020, 4:33 PM IST

लखनौ - उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात शनिवारी भाजप आमदार संगीत सोम यांच्या निकटवर्तीयाची काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केल्याची घटना घडली आहे. मोनू अहलावत, असे आमदार संगीत सोम यांच्या प्रतिनिधीचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, मोनू घरी आपल्या खोलीत असताना त्यांच्या कुटुंबीयांना खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आला. यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेतली असता त्यांना मोनू यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांचा मृत्यू अत्यंत रहस्यमय स्थितीत झाला आहे. मोनू यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्राथमिक चौकशीत हे आत्महत्येचे प्रकरण असू शकते. मात्र, फॉरेन्सिक विभागाला मोनू यांचा खून झाल्याचा संशय आहे. एकदा शवविच्छेदन अहवाल आला की मृत्यूचे नेमके कारण शोधता येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मृत मोनू अहलावत हे दौराळा येथील रहिवासी असून ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याच्या आईने 2017 मध्ये महापालिका निवडणूक लढविली होती. तसेच मोनू अहलावत हे भाजप आमदार संगीत सोम यांचे निकटवर्तीय होते, जे सरधना मतदारसंघाचे आमदार आहेत. दरम्यान, मोनू यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.