ETV Bharat / briefs

भिवंडीतील चिंचोटी - मानकोली रस्त्याची दुरावस्था; नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास - भिवंडी रस्त्याची दुरावस्था बातमी

टोल वसुली करणाऱ्या सुप्रीम कंपनीने रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने अंजुरफाटा ते खारबावपर्यंत महामार्गावर मोठे खड्डे पडले असून वडघर येथे रस्ता पूर्णतः नादुरुस्त झाला आहे.

भिवंडी खराब रस्ते
भिवंडी खराब रस्ते
author img

By

Published : Jun 13, 2020, 10:08 PM IST

ठाणे - भिवंडीतील चिंचोटी अंजुरफाटा ते मानकोली या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या रस्त्याकडे टोल वसूल करणाऱ्या ठेकदाराचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात रस्त्यांची आवश्यक कामे पूर्ण करण्याच्या सूचना राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्वच टोल कंपन्यांना दिले आहेत. मात्र, या रस्त्यावर टोल वसुली करणाऱ्या सुप्रीम कंपनीने रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने अंजुरफाटा ते खारबावपर्यंत महामार्गावर मोठे खड्डे पडले असून वडघर येथे रस्ता पूर्णतः नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होऊन नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली असून अंजुरफाटा ते खारबाव पर्यंतचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत

दरम्यान, यापूर्वी अनेकवेळा अंजुरफाटा ते खारबाव रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत येथील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून टोल वसुली बंद पडली होती. तर गेल्यावर्षी पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्या विरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून गावकऱ्यांना रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यास विनंती करून रस्ता लवकरच दुरुस्त केला जाईल, असे आश्वसन दिले होते. तसेच काही प्रमाणात रस्त्यावरील खड्डेही बुजविण्यात आले होते. आता मात्र दोन ते तीन दिवस पडलेल्या पावसामुळे रस्ता खड्डेमय झाल्याचे दिसून येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.