ETV Bharat / briefs

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अमरावती शहरात संचारबंदी - अरावती कोरोना बातमी

जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यात कोरोना रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. गंभीर बाब म्हणजे कोरोनामुळे अमरावतीत 30 जण दगावले आहेत. मागील 15 दिवसांपासून प्रत्येक दिवशी 20 ते 25 कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने भीती आणखी वाढली आहे.

अमरावती शहर संचारबंदी
अमरावती शहर संचारबंदी
author img

By

Published : Jul 11, 2020, 7:00 PM IST

अमरावती - शहर आणि जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाग्रस्तांची संख्या 800 च्या वर गेली आहे. तर संसर्गामुळे 30 जणांचा मृत्यू झाला आहे. अमरावतीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी (10 जुलै) सायंकाळी 7 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी घोषीत केली आहे. संचारबंदी दरम्यान संपूर्ण शहरात कडकडीत बंद असून जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.

कोरोनामुळे अमरावती शहर 24 मार्च ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन होते. 1 जुलैपासून शहरातील लॉकडाऊन शिथिल होताच नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडू लागले. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बाजारपेठ खुली ठेवण्याची परवानगी मिळताच शहरात दिवसभर गर्दी होत होती. त्यामुळे कोरोना अतिशय वेगाने शहरभर पसरला.

अमरावती शहरातील हत्तीपुरा, बदनेराह, हबिबनगर, छाया कॉलनी, ताजनगर, रातनगंज, खोलपुरी गेट, मासांगनज, अंबागेट, सराफा बाजार, वडाळी, चपराशी पुरा, गाडगेनगर, शेगाव नाका, तपोवन, कंवरनगर, याशोदा नगर, दस्तुरनगर, टोपे नगर, लालखडी, कांता नगर, मांगीलाल प्लॉट, महेंद्र कॉलनी, विलास नगर, अंबापेठ, गांधी चौक , शंकर नगर, आकोली, साई नगर, अशोक नगर, अर्जुन नगर, राहाटगाव अशा सर्वच भागत कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यात कोरोना रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. गंभीर बाब म्हणजे कोरोनामुळे अमरावतीत 30 जण दगावले आहेत. मागील 15 दिवसांपासून प्रत्येक दिवशी 20 ते 25 कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने भीती आणखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेपासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत.

संचारबंदीमुळे शुक्रवारी शहरात प्रचंड गर्दी झाली होती. शनिवारी मात्र शहराच्या सर्वच भागात शुकशुकाट पाहायला मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व बाजारपेठ बंद होती. राजकमल चौक, राजापेठ, नावथे चौक, बडनेरा, चित्र चौक, इतवारा बाजार, इर्विन चौक, पंचवटी चौक, शेगाव नाका, बियाणी चौक, चपराशी पुरा, तपोवन, अर्जुन नगर, वडाळी नाका आशा सर्व महत्वाच्या चौकात आणि परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. संचारबंदीमुळे अमरावतीकर घरात असून विनाकारण बाहेर पाडणाऱ्यांना पोलीस कारवाईचा सामना करावा लागला.

संचारबंदीमुळे अमरावती शहर आणि जिल्ह्यात कडेकोट बंद असून सोमवारपर्यंत असणाऱ्या या बंदमुळे कोरोनाची साखळी तुटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.