पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी (दि. 9 जुलै) 587 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 172 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 3 हजार 681 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांनी 6 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. बाधित रुग्णांची एकूण संख्या 6 हजार 61 वर पोहोचली असून शहरातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक होत आहे.
आज मृत्यू झालेले रुग्ण विठ्ठलवाडी (पुरुष, वय-67 वर्षे), चिंचवड (स्त्री, वय-48 वर्षे), काळेवाडी (स्त्री, वय-50 वर्षे), आकुर्डी (पुरुष, वय-63 वर्षे), रहाटणी (पुरुष, वय-62 वर्षे), गांधीनगर (स्त्री, वय-38 वर्षे), पिंपरी (पुरुष, वय-51 वर्षे), पिंपरी (पुरुष, वय-51 वर्षे), आकुर्डी (पुरुष, वय-70 वर्षे), इन्दुरी (पुरुष, वय-65 वर्षे), पुणे (स्त्री, वय-65 वर्षे), येथील रहिवासी आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील 9 तर 2 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत 122 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.