नंदुरबार - राज्यात सर्वत्र ऑक्सिजनची आणीबाणी असली तरी नंदुरबार जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यात तीन ठिकाणी हवेपासून ऑक्सिजन निर्माण करणारे तसेच शहादा व नंदुरबार येथे प्रत्येकी एक, असे एकूण पाच प्लांट तयार करून ऑक्सिजन निर्मिती सुरू केली आहे. जिल्हा ऑक्सिजन बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी याबाबत माहिती दिली.
हवेतुन ऑक्सिजन बनविण्याचे दोन प्लांट -
कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आसल्याने ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. ऑक्सिजन मिळवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र, नंदुरबार जिल्हा प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात हवेपासून ऑक्सिजन तयार करणारे दोन प्लांट तयार केले आहेत. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रॉ मटेरियलची गरज नसून हवेतील ऑक्सिजन घेऊन या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती केली जात आहे. जिल्हा रुग्णालयाला दररोज 400 जंबो सिलेंडर ऑक्सिजनची गरज असायची हे दोघे प्लांट सुरू झाल्यापासून ती गरज अवघ्या 150 सिलेंडर वर येऊन ठेवले आहे. स्वतः ऑक्सिजन निर्मिती होत असल्याने ऑक्सिजन बाबतीत जिल्हा रुग्णालय सवय पूर्ण झाले आहे, अशी माहिती
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांताराव सातपुते यांनी दिली.
ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता प्लांटची उभारणी -
जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज ओळखून प्रशासनाच्या वतीने जिल्हा नियोजन समिती आणि कंपन्यांचा सामजिक दायित्व निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात नंदुरबार, शहादा तळोदा आणि नवापूर या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाची ऑक्सिजन गरज हवेपासून ऑक्सिजन तयार करून भागवण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.