ETV Bharat / briefs

सोलापूर ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक; ग्रामीण भागात आज 40 कोरोना रुग्णांची नोंद

author img

By

Published : Jul 1, 2020, 10:15 PM IST

अक्कलकोटमध्ये काल पेठ येथे राहणारे 68 वर्षीय पुरुष वृद्ध कोरोना पॉजिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यांच्यावर सिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. आज उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

सोलापूर- ग्रामीण भागात कोरोनाचा आलेख वाढतच चालला आहे. आज 40 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीण भागात एकूण 401 रुग्ण वाढले असून मार्डी गावात आज एकाच दिवसात 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सोलापूर ग्रामीण भागात वाढलेल्या रुग्णापैकी 23 पुरुष व 17 महिलांचा समावेश आहे, तर 12 रुग्ण बरे होऊन घरी परत गेले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये बक्षी हिप्परगा येथील 1 महिला, नवीन विडी घरकूलमधीक 3 पुरुष 2 महिला, होटगी स्टेशन येथील 1 महिला, लिंबी चिंचोळी येथील 1 पुरुष, कुंभारी येथील 1 महिला, पंढरपूर येथील 4 पुरुष, मोहोळ येथील आष्टी येथील 1 महिला, मेहबूबनगर येथील 1 महिला, अक्कलकोटमधील किसत्येक मळा येथील 1 पुरुष,1 महिला, तर अक्कलकोटमधील माणिक पेठेतील 3 पुरुष, 1 महिला, बुधवार पेठ येथील 1 महिला, सोलापूर उत्तर तालुक्यामधील बानेगाव येथील 2 पुरुष, तर मार्डी या गावातील तबल 9 पुरुष व 6 महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे एकूण 40 रुग्ण पॉजिटिव्ह आले आहेत.

अक्कलकोटमध्ये काल पेठ येथे राहणारे 68 वर्षीय पुरुष वृद्ध कोरोना पॉजिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यांच्यावर सिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. आज उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

चौकट मार्डी गावात कोरोनाचा उद्रेक

सोलापूर उत्तर तालुक्यातील मार्डी गाव हे कोरोना हॉटस्पॉट गाव होण्याच्या मार्गावर आहे. कारण आज एकाच दिवसात गावात एकूण 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. एकाच दिवसात एका छोट्याश्या गावात एवढे रुग्ण आढळल्याने प्रशासनासमोर एक मोठे आवाहन निर्माण झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.