ETV Bharat / briefs

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील 3 आरोपी कोरोनाबाधित; पोलीस ठाण्यात खळबळ - Vitthalwadi police station thane

आरोपींना कोठडीत डांबण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी करणे बधंनकारक आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांची आरोग्य तपासणीसह कोरोना टेस्ट केली. त्यात 5 पैकी 3 आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. आता त्यांना पुढील उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Vitthalwadi police station corona
Vitthalwadi police station corona
author img

By

Published : Jul 4, 2020, 10:11 PM IST

ठाणे- विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या 5 पैकी 3 आरोपींना कोरोनाची लागण झाल्याने पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. तर कोरोनाबाधित आरोपींच्या संपर्कात आलेल्या पोलिसांवर विलगीकृत होण्याची वेळ आली आहे.

उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिसांनी एका गुन्ह्या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली होती. या आरोपींना नंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्व आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपींना कोठडीत डांबण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी करणे बधंनकारक आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांची आरोग्य तपासणीसह कोरोना टेस्ट केली. त्यात 5 पैकी 3 आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. आता त्यांना पुढील उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तर, दुसरीकडे कोठडीतील आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यावर पोलिसांचे धाबे दणाणले आहे. कोरोनाबाधित आरोपींच्या संपर्कात आलेल्यांपैकी अनेकांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे.

दरम्यान, शहरातील उल्हासनगर, मध्यवर्ती, विठ्ठलवाडी व हिललाईन पोलीस ठाण्यातील काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने, पोलिसांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वीही शहरातील पोलीस ठाण्यांमधील पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराने विविध गुन्ह्यातील आरोपींना अटक करावी की नाही, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.