मुंबई - मुंबईत बुधवारी कोरोनाच्या 2 हजार 848 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2257 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 2 लाख 19 हजार 938 वर पोहचला असुन मृतांचा आकडा 9 हजार 245 वर पोहचला आहे.
मुंबईत मार्चपासुन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. मुंबईत (बुधवारी) कोरोनाचे 2848 नवे रुग्ण आढळून आले असून 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 39 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 33 पुरुष तर 13 महिला रुग्ण आहेत.
तर, मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 19 हजार 938 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 245 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 2257 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 83 हजार 742 वर गेला आहे. सध्या मुंबईत 24 हजार 783 सक्रिय रुग्ण आहेत.
दरम्यान, सध्या मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 67 दिवस तर सरासरी दर 1.04 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 651 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 10 हजार 097 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 12 लाख 04 हजार 081 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.