ETV Bharat / briefs

नवी मुंबईत आज 172 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 10 रुग्णांचा मृत्यू, एकूण आकडा 4 हजार 698 वर

गेल्या 10 ते 15 दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या नवी मुंबईत झपाट्याने वाढत आहे. हे वाढलेले रुग्ण प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 4 हजार 698 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवाशी होते.

New Mumbai municipal corporation
New Mumbai municipal corporation
author img

By

Published : Jun 20, 2020, 8:08 PM IST

नवी मुंबई - नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांनी साडेचार हजारांचा आकडा पार केला असून आजही चक्क 172 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतच आहे. आज 80 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुळे आज 10 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

गेल्या 10 ते 15 दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या नवी मुंबईत झपाट्याने वाढत आहे. हे वाढलेले रुग्ण प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 4 हजार 698 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवाशी होते.

आत्तापर्यंत नवी मुंबईत 16 हजार 634 लोकांची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 11 हजार 274 जण निगेटिव्ह आले असून, 673 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबीत आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4 हजार 687 इतकी आहे.

आज 172 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून तुर्भेमधील 14, बेलापूरमधील 24, कोपरखैरणेमधील 29, नेरुळमधील 32, वाशीतील 11, घणसोलीमधील 28, ऐरोलीमधील 27, दिघ्यातील 7 असे एकूण 172 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 67 स्त्रिया व 105 पुरुषांचा समावेश आहे.

शहरात 4 हजार 687 इतका कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा झाला आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 2 हजार 683 व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून ते बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत.

तर आज नेरूळ मधील 10, तुर्भेमधील 33, कोपरखैरणेमधील 12, घणसोलीमधील 8, ऐरोलीमधील 16, दिघा 1 अशा एकूण 80 व्यक्ती आज कोरोनामुक्त झाले असून ते बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये 28 स्त्रिया आणि 52 पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थितीमध्ये 1 हजार 847 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 157 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आज 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.