अकोला - रविवारी (14 जून) सायंकाळी आलेल्या कोरोनाच्या दैंनदिन अहवालात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे अकोलेकरांना काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळाला आहे. सकाळी आलेल्या अहवालांमध्ये 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच आज दिवसभरात 12 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान, रविवारी ज्या 12 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यापैकी तिघांना घरी सोडण्यात आले आहे. तर उर्वरीत 9 जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. यात 7 महिला आणि 5 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यातील 5 जण हे तापडीया नगर, 2 जण गुलजारपुरा येथील तर उर्वरीत प्रत्येकी एक अकोट फैल, तार फैल, सिंधी कॅम्प, शिवाजीनगर, खदान येथीलरहिवासी आहेत.
प्राप्त अहवाल -100
पॉझिटीव्ह - 22
निगेटीव्ह -78
आताची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - 1007
मृत्यू - 51
डिस्चार्ज - 637
अॅक्टिव रूग्ण - 319