ETV Bharat / briefs

नवी मुंबईत आज 111 नवे कोरोना पॉझिटिव्ह; एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 हजार पार

गेल्या 15 दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या नवी मुंबईत झपाट्याने वाढत आहे. हे वाढलेले रुग्ण प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहे.

New mumbai
New mumbai
author img

By

Published : Jun 23, 2020, 10:56 PM IST

Updated : Jun 24, 2020, 3:42 PM IST

मुंबई - नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 5 हजारच्या पार गेला असून आजही चक्क 111 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतच आहे. आज 151 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुळे आज 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 15 दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या नवी मुंबईत झपाट्याने वाढत आहे. हे वाढलेले रुग्ण प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 5 हजार 83 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते.

आत्तापर्यंत नवी मुंबईत 17 हजार 604 लोकांची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 11 हजार 643 जण निगेटिव्ह आले असून, 889 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 हजार 72 इतकी आहे. आज 111 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून तुर्भेमधील 2, बेलापूरमधील 7, कोपरखैरणेमधील 16, नेरुळमधील 7, वाशीतील 13, घणसोलीमधील 23, ऐरोलीमधील 28, दिघ्यातील 15 असे एकूण 111 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 38 स्त्रिया व 73 पुरुषांचा समावेश आहे.

शहरात 5 हजार 72 इतका कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झाला आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 3 हजार 1 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून त्या घरी परतल्या आहेत. तर आज बेलापूरमधील 9, नेरूळमधील 28, वाशीमधील 18, तुर्भेमधील 27, कोपरखैरणेमधील 22, घणसोलीमधील 19, ऐरोलीमधील 18, दिघा 10 अशा एकूण 151 व्यक्ती आज कोरोनामुक्त झाल्या असून त्या घरी परतल्या आहेत. यामध्ये 49 स्त्रिया आणि 102 पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थितीमध्ये 1 हजार 894 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 177 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आज 9 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Last Updated : Jun 24, 2020, 3:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.