ETV Bharat / bharat

Youtuber ishika sharma murder case: युट्युबर इशिका शर्मा खून प्रकरणात मोठा खुलासा.. एकतर्फी प्रेमातून झाली हत्या - यूट्यूबर इशिका शर्मा मर्डरमध्ये मोठा खुलासा

छत्तीसगडच्या जांजगीर चंपा येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या इशिका शर्मा खून प्रकरणाचा पोलिसांनी खुलासा केला आहे. शवविच्छेदन अहवालात या हत्येची पुष्टी झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी दरोडा आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 पथके तयार केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Youtuber ishika sharma murder case
युट्युबर इशिका शर्मा खून प्रकरणात मोठा खुलासा.. एकतर्फी प्रेमातून झाली हत्या
author img

By

Published : Feb 15, 2023, 8:21 PM IST

युट्युबर इशिका शर्मा खून प्रकरणात मोठा खुलासा..

जांजगीर चंपा (छत्तीसगड): इशिका शर्मा हत्याकांडात शवविच्छेदनापूर्वीच लोकांना हत्येची भीती होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना पकडण्यासाठी पोलीस रायगड बिलासपूर आणि बालोदा बाजारकडे निघाले होते. आरोपी रोहन पांडूचे इशिकाच्या घरी येणे-जाणे होते. पोलिसांना त्याच्यावरच संशय होता. पोलिसांनी आरोपी रोहन पांडू याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सर्व काही आरोप फेटाळून लावले होते. नंतर चौकशीत हत्याकांडाचा खुलासा झाला आहे.

हत्येनंतर रोहन फरार : या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहन पांडू हा घटनेच्या दिवशी सकाळी सक्ती, खरसिया आणि रायगड येथे गेला होता. आरोपीने वेश बदलून कपडे बदलले, त्यानंतर हसौद, बिर्रा मार्गे तिल्डा येथे पोहोचला. तिल्डा येथून कावर्धा नंतर आरोपी आपल्या गावातील मित्रांसह मुंगेली येथे येत होता. त्याला वाटेत पोलिसांनी पकडले. या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहन पांडू असून, त्याने राजेंद्र सूर्यासोबत मिळून इशिकाची हत्या केली. पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल, स्कूटी, दागिने जप्त केले आहेत.

आरोपीला आधीच ओळखत होता : आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता. त्याचे मुलीच्या घरी येणे-जाणे होते. तो मनातल्या मनात त्या मुलीवर प्रेम करू लागला. दरम्यान, इशिकाशी लग्न करण्याचा विचारही त्याच्या मनात आला. यासाठी तो अनेकदा इशिकाला मोबाईल दागिने सारख्या महागड्या वस्तू भेट द्यायचा. परंतु इशिका दुसऱ्याच मुलाशी बोलायची. यावरून दोघांमध्ये वाद झाला. परंतु इशिका न पटल्याने आरोपी रोहनने इशिकाला मारण्यासाठी एक योजना बनवली.

कसा झाला खून: एसपी विजय अग्रवाल यांनी सांगितले की, 'आरोपींनी आधी झोपेच्या गोळ्या विकत घेतल्या, नंतर त्या खाण्यात मिसळून इशिका आणि तिच्या भावाला खायला दिल्या.' आरोपीचा मित्र राजेंद्र सूर्याही भदौरा येथून रात्री दहा वाजता घटनास्थळी पोहोचला. ज्याला रोहनने घटनेच्या दिवशी दोनशे रुपये देऊन बोलावले होते. दोघांनी एकत्र दारू प्यायली आणि घरी पोचल्यावर जेवण केले. यादरम्यान पुन्हा एकदा आरोपींनी इशिकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद सुरू असताना रोहन आणि राजेंद्र यांनी इशिकाचा गळा आवळून खून केला. ज्यामध्ये एका आरोपीचा पाय धरला तर दुसऱ्याने त्याचा गळा आणि तोंड दाबले. खून केल्यानंतर आरोपी इशिकाचा मोबाईल आणि दागिने घेऊन फरार झाला.

पोलिसांचे काय आहे म्हणणे: जांजगीरचे एसपी विजय अग्रवाल यांनी सांगितले की, 'रोहनसोबत राजेंद्र सूर्या देखील आरोपींमध्ये होता. ही घटना पूर्वनियोजित होती. दोघांनी मिळून मुलीचा गळा दाबून खून केला आणि तिच्या अंगात असलेले दागिने आणि मोबाईल घेऊन पळ काढला. आरोपींना चकवा देण्यासाठी त्याचे स्वरूप बदलले होते.त्याने केस लहान केले होते आणि कपडे बदलले होते. तो शहराबाहेर गेला होता आणि इकडे मित्रांकडून माहिती घेत होता. नजर ठेवत होता. तो रायगड मार्गे कावर्धा आणि टिल्डा येथे पोहोचला होता.

खाण्यात मिसळल्या नशेच्या गोळ्या: एसपी विजय अग्रवाल पुढे म्हणाले की, 'आरोपींनी मृताची स्कूटी सोबत ठेवली होती. या संपूर्ण घटनेत त्याचा साथीदार राजेंद्र यालाही अटक करण्यात आली आहे. आरोपींनी चार ते पाच दिवसांपूर्वी हत्येचा कट रचला होता. प्लॅनिंग करून त्यांनी हत्या केली. आरोपी रोहनला इशिकासोबत लग्न करायचे होते. इशिका इतर मुलांशी बोलायची. इशिकाचे इतर मुलांशीही संबंध असल्याचा त्याला संशय होता, त्यावरून वाद व्हायचे. यातूनच त्याने इशिका शर्माची हत्या केली. आरोप केला. त्याने हॉटेलमधून खरेदी केलेल्या खाण्यात काही नशेच्या गोळ्या मिसळल्या. आरोपीने जेवण करताना मद्य प्राशन केले. मुलगी आणि तिचा भाऊ झोपल्यावर दोघांनी मिळून ही हत्या केली. आरोपीने तिचा गळा दाबून खून केला.

हत्या केव्हा झाली: YouTuber इशिका शर्माचा मृतदेह 13 फेब्रुवारी रोजी छत्तीसगडच्या जांजगीर जिल्ह्यात तिच्याच घरातील बेडरूममध्ये सापडला होता. शॉर्ट पीएममध्येच हत्येची पुष्टी झाली होती. इशिकाचा भाऊही घरात होता. घटनेच्या वेळी घरात हजर होता मात्र त्याच्या खोलीचा दरवाजा कोणीतरी बाहेरून लावला होता.त्यामुळे पोलिसांचा खून झाल्याचा संशय बळावला.अखेर आता इशिकाचा मारेकरी पोलिसांच्या ताब्यात आहे.

हेही वाचा: Nikki Yadav Murder Case: निक्की यादव हत्याकांड.. गळा दाबूनच केली हत्या.. पोस्टमार्टम रिपोर्टमधून आलं सत्य बाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.