ETV Bharat / bharat

Crime in Hotel Room: तरुणीला घेऊन 'लॉज'मध्ये जाताय तर सावधान.. दिल्लीत घडलं 'असं' काही की वाचून..

author img

By

Published : Jan 11, 2023, 7:50 PM IST

दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये असलेल्या लॉजिंगमध्ये एक तरुण समवयस्क तरुणीला घेऊन गेला होता. रूममध्ये जाऊन दरवाजा लावून घेतल्यानंतर बराच काळ दरवाजा न उघडल्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना संशय आला. नंतर दरवाजा उघडून पाहिले असता संशयास्पद परिस्थितीत दोघांचे मृतदेह आढळून आले. तर पाहुयात काय आहे प्रकरण.. man and woman died in suspicious circumstances

Unmarried couple found dead under mysterious circumstances in an Hotel room in South Delhi
तरुणीला घेऊन 'लॉज'मध्ये जाताय तर सावधान.. दिल्लीत घडलं 'असं' काही की वाचून..
हॉटेलमध्ये युवक युवतीचा संशयास्पद मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील बवाना येथील हॉटेलमध्ये एका तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दिल्लीतील बवाना पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्ये एका तरुण आणि महिलेचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत तरुणीच्या मानेवर जखमेच्या खुणा आहेत, त्यामुळे तरुणाने मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल: पोलिसांनी मृतांच्या ओळखपत्रावरून मृतदेहाची ओळख पटवून नातेवाईकांना माहिती दिली. विमल असे मृत तरुणाचे नाव असून तो बवाना औद्योगिक परिसरात कामाला होता. सध्या बवाना पोलीस स्टेशन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून उर्वरित पुरावे गोळा करण्यासाठी गुन्हे पथक आणि फॉरेन्सिक म्हणजेच एफएसएल पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. याप्रकरणी सातत्याने चौकशी सुरू आहे. पोलीस सर्व शक्यता तपासत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मुलीच्या मानेवर जखमेच्या काही खुणाही आढळून आल्या असून खोलीत सल्फास पावडर व दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत.

दोघेही आहेत २१ वर्षांचे: मरण पावलेल्या तरुण आणि तरुणी दोघांचे वय 21 वर्षे आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता दोन्ही मृतक एकत्र हॉटेलमध्ये आले होते. बराच वेळ होऊनही रूमची बुकिंगची वेळ संपूनही दोघेही बाहेर न आल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खोली उघडली, मात्र आतून कोणीही खोली उघडली नाही. यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला असता तरुण व तरुणीचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

हॉटेलमधील घटना वाढल्या: दरम्यान, अशा प्रकारे हॉटेलमध्ये हत्या किंवा आत्महत्या होण्याच्या घटना वाढत आहेत. मध्यंतरी गाझियाबाद मधील एका हॉटेलमध्ये एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली होती. या घटनेत पीडितेच्या प्रियकरावर प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. पीडित महिला आणि तिचा प्रियकर हे दोघे रात्रभर हॉटेलमध्ये थांबले. दरम्यान, प्रियकर हा सकाळी एटीएममधून पैसे काढण्याच्या बहाण्याने हॉटेलबाहेर पडला तो परत आलाच नाही. त्यामुळे असे प्रकार वाढत असल्याने हॉटेलमध्ये जाणाऱ्या तरुण तरुणींनी काळजी घेण्याची गरज आता सुजाण नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा : लॉजवरील गुप्त खोल्यांमध्ये चालणाऱ्या हायटेक सेक्स रॅकेटचा भांडाफोड 7 महिलांची सुटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.