ETV Bharat / bharat

Ban on 2000 notes : तुमच्याकडेही असेल 2 हजाराची नोट, तर काय कराल शेठ; जाणून घ्या नोट बदलीची प्रक्रिया

आरबीआयने क्लीन नोट पॉलिसीनुसार या नोटा रद्द केल्या आहेत. आरबीआयने शुक्रवारी हा धक्कादायक निर्णय घेतला. आरबीआयने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटा बँकेत जमा करण्यास सांगितले आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा का रद्द करण्यात आल्या आहेत याविषयी जाणून घेऊ.

Ban on 2000 notes
Ban on 2000 notes
author img

By

Published : May 20, 2023, 3:12 PM IST

नवी दिल्ली : देशातील चलनात असलेली सर्वात मोठी 2 हजाराची नोट व्यवहारासाठी बंद करण्यात आली आहे. आरबीआयने शुक्रवारी हा धक्कादायक निर्णय घेतला. या निर्णयाने देशातील नागरिकांची धकधक वाढली. तर काही राजकीय नेत्यांनी आरबीआय आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान या नोटा का रद्द करण्यात आल्या याची माहितीही आरबीआयनेही दिली आहे.

का घेतला निर्णय : भारताच्या चलनात या नोटाचा वाटा कमी होऊ लागला होता. २०१७ मध्ये या नोटांच्या एकूण मूल्यांमध्ये 50.2 टक्के वाटा होता. तर 31 मार्च 2022 मध्ये या नोटांचा चलन वाटा फक्त 13.8 टक्के होता. तसेच बऱ्याचशा नोटा २०१७ पूर्वी छापल्याने त्यांचे आयुष्यही संपत आले होते. तसेच या नोटा चलनात फार मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात नव्हत्या. आरबीआयने क्लीन नोट पॉलिसीनुसार या नोटा रद्द केल्या आहेत. नागरिकांना चांगल्या दर्जाच्या नोटा मिळाव्यात ही आरबीआयची पॉलिसी आहे, याला क्लीन नोट पॉलिसी म्हटले जाते.

दोन हजारच्या नोटांचे काम झाले - आरबीआय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2016 मध्ये नोटाबंदी केली होती. त्यावेळी चलनात असलेल्या 1 हजार रुपयांच्या नोटांच्या बदल्यात 2 हजारची नोट आणली होती. त्यावेळी इतर मुल्यांच्या नोटा पुरेशा नव्हत्या. आता या नोटा उपलब्ध झाल्या आहेत, त्यामुळे आता 2 हजारच्या नोटांचा उद्देश पूर्ण झाला असून 2018-19 या वर्षात या नोटांची छपाई थांबवण्यात आली.

बाजारात यापुढेही चालणार नोटा? : नोट बंदी केली म्हणून साऱ्या देशात धूम ठोकली गेली आहे. आता नोट बंद झाली म्हणून आपल्या पैशांचे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण यावर आरबीआयने स्पष्टपणे सांगितले आहे की, या नोटा यापुढेही लीगल टेंडर म्हणून चालतील. म्हणजेच काय तुमच्याकडे दोन हजाराची नोट असेल तर ती तुम्हाला वापराता येईल. पण आरबीआयने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटा बँकेत जमा करण्यास सांगितले आहे.

बँकेत कशाप्रकारे नोटा बदलणार :

  • येत्या २३ मे पासून बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार
  • ३० सप्टेंबरपर्यंत नागरीक आपल्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करू शकतील.
  • तुमचे बँक खाते असेल त्या खात्यातही या नोटा जमा करता येतील.
  • जर बँक खाते नसले तरी तुम्ही बँकेत जाऊन या नोटा बदलून त्याच्याऐवजी १००, ५०० च्या नोटा घेऊ शकतात.
  • RBI च्या १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये २० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण करता येईल.

किती नोटा बदलता येतील :

  • KYC (Know your Customer) च्या नियमांप्रमाणे मर्यादेशिवाय तुम्हाला पैसे बँक खात्यात जमा करता येतील.
  • जर KYC नसेल तर रिझर्व्ह बँकेने घालून दिलेले नियम लागू असतील.
  • नोटा बदलून घेणाऱ्या व्यक्तीला एका वेळी जास्तीत जास्त २० हजार रुपये इतर नोटांच्या स्वरुपात बदलून घेता येतील.
  • बँकेचा खातेदार नसलेली व्यक्तीदेखील एका दिवशी २० हजार रुपये मूल्याच्या दोन हजारांच्या नोटा बदलू शकते.

का आणल्या होत्या 2 हजारच्या नोटा : सरकारने काळा पैसा बाहेर आणण्यासाठी, भ्रष्टचार दूर करण्यासाठी नोटाबंदी केली होती. त्यावेळी सरकारला अपेक्षा होती की, ३ ते ४ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर येईल. मोठी टीका सहन करून सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. कारण काळा पैसा फक्त १.३ लाख कोटी इतकाच हाताशी आला. परंतु नव्याने जारी केलेल्या ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांमधून आता ९.२१ लाख कोटी रुपये गायब झाले आहेत. एनसीआरबीच्या डेटानुसार, २०१६ ते २०२० या काळात देशात जप्त करण्यात आलेल्या २ हजार रुपयांच्या बनावट नोटांची संख्या वाढली आहे. बनावट नोटांची संख्या आधी २ हजार २७२ होती ती आता २ हजार ४४ हजार ८३४ वर पोहोचली आहे. तर २०१६ मध्ये २ हजारच्या बनावट नोटांची संख्या २ हजार २७२ होती.

हेही वाचा

  1. 2 thousand note ban : नागरिकांचे अर्थ गणित बिघडवणारी 2 हजारची गुलाबी नोट का झाली बंद, काय होता इतिहास
  2. Today Petrol Diesel Rates : वाचा आजचे क्रिप्टोकरन्सी, पेट्रोल डिझेल, भाजीपाला व सोने चांदीचे दर
  3. 2000 Note Ban : नोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याची भाजपची पद्धतशीर योजना - धंगेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.