हिंदू धर्मात हरतालिका तीजचा Hartalika Teej 2022 उपवास विवाहित महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला स्त्रिया हरतालिका तीजचा निर्जल उपवास करतात आणि भोलेनाथ आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना केली जाते.भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे व्रत Vrat of Haritalike पाळले जाते. विवाहित स्त्रिया हरितालिका व्रत करतात. यावर्षी हे व्रत 30 ऑगस्ट 2022 ला आलेले आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 29 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03:20 ते 30 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03:33 पर्यंत असेल. 30 ऑगस्टला सकाळी 06:05 ते राञी 08:38 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल.
हरतालिकेचे महत्त्व पतीप्रती आपली सद्भावना आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी तसेच इच्छित पती मिळावा यासाठी हरतालिकेच्या व्रताचे पालन करण्यात येते. इच्छित वर मिळावा म्हणून विवाह इच्छुक मुलीही हरतालिकेचे व्रत करतात. व्रतात आठ प्रहर उपवास केल्यानंतर अन्नसेवन करण्यात येते. भविष्योत्तर पुराणानुसार हरतालिका व्रताच्या दिवशी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हस्तगौरी, हरिकाली व कोटेश्वरी व्रताचेही पालन करण्यात येते. यामध्ये आदी शक्तीमाता पार्वतीचे गौरीच्या रूपात पूजन करण्यात येते. भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशीच हस्तगौरी व्रताचे अनुष्ठान होते. महाभारत काळातही हे व्रत पाळण्यात येत असल्याचे संदर्भ आढळतात. भगवान श्रीकृष्णाने राज्यप्राप्तीसाठी, धन धान्याच्या समृद्धीसाठी कुंतीस या व्रताचे पालन करण्यास सांगितले होते. यामध्ये 13 वर्षांपर्यंत शिव पार्वती व श्रीगणेशाचे ध्यान करण्यात येते.
हरतालिका व्रताचे नियम
- हरतालिका व्रत निर्जल करावे.
- एकदा हे व्रत केले की ते दरवर्षी करावे.
- सुतक इत्यादींमुळे पूजा करता येत नसली तरी उपवास करावा. व्रताची पूजा करू नये.
- शिव आणि पार्वतीची पूजा करावी.
हरितालिका पूजा विधी हरितालिका व्रत कुमारिका आणि विवाहित स्त्रिया करतात. कुमारिका चांगला पती मिळावा यासाठी तर विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि संसार सुखाचा व्हावा यासाठी हे व्रत करतात. या दिवशी सकाळी सर्व विधी आटोपल्यानंतर हरितालिका व्रताचा संकल्प करावा. पार्वती आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची चौरंगावर स्थापना करावी. या दिवशी वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली जाते. षोडशोपचार पूजा करून हरतालिकेसाठी हिरव्या बांगड्या वाहिल्या जातात आणि विविध प्रकारच्या झाडांची पाने अर्पण केली जातात. या दिवशी दिवसभर कडक उपवास केला जातो. फळांचा नैवेद्य दाखवून देवीची आरती केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आरती करून नैवेद्य दाखवला जातो. यानंतर मूर्तींचं विसर्जन करून व्रत पारण केले जाते.