एकोणिसाव्या शतकात जगाने दोन महायुद्धे पाहिली. सत्ता स्पर्धा आणि जागतिक राजकारणात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेक देशांनी या महायुद्धामध्ये सहभाग घेतला. 1939 ते 1946 या सहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत दुसरे महायुद्ध झाले. या विनाशकारी महायुद्धाला 2 सप्टेंबर 2021ला 76 वर्षे पूर्ण होत आहेत. या महायुद्धाचा आढावा घेणारी ही विशेष स्टोरी...
दुसऱ्या महायुद्धात सुमारे 70 देशांचे सैन्य सामील होते. या युद्धात दोन गट पडले होते. ती म्हणजे मित्र राष्ट्र आणि अक्ष राष्ट्रे. विविध राष्ट्रांतील सुमारे 10 कोटी सैनिकांनी युद्धात भाग घेतला. या युद्धात सहभागी असलेल्या सर्व महासत्तांनी या युद्धात आपली आर्थिक, औद्योगिक आणि वैज्ञानिक क्षमता फेकून दिली होती.
अक्ष राष्ट्रे -
जर्मनी, इटली व जपान यांनी सप्टेंबर 1940 मध्ये त्रिपक्षी तह केल्यावर त्यांना अक्ष राष्ट्रे हे नाव दिले गेले. ही दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांविरुद्ध लढणारी राष्ट्रे होती. यात बल्गेरिया, हंगेरी, रोमानिया, क्रोएशिया आणि स्लोव्हाकिया ही दोन जर्मन निर्मित राज्ये देखील समाविष्ट होती. या राष्ट्रांची युद्धात सरशी होत असताना बहुतांश युरोप, आफ्रिका व नैऋत्य आशियात त्यांची सत्ता होती. युद्धांती सगळ्या अक्ष राष्ट्रांचा सपशेल पराभव झाला होता.
अक्ष राष्ट्राच्या गंठबंधनाचे प्रमुख नेते -
जर्मनीचे अॅडॉल्फ हिटलर, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो आणि इटलीचे पंतप्रधान बेनिटो मुसोलिनी.
मित्र राष्ट्र
संयुक्त राज्य अमेरिका, ग्रेट ब्रिटेन आणि सोव्हिएत युनियनने मित्र राष्ट्रांची स्थापना केली. यामध्ये 1939 ते 1944 दरम्यान किमान 50 जण एकत्र आले. याशिवाय 1945 पर्यंत यात ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्राझील, ब्रिटिश कॉमनवेल्थ नेशन्स, कॅनडा, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, चेकोस्लोव्हाकिया, डेन्मार्क, फ्रान्स, ग्रीस, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, फिलिपाईन्स आणि युगोस्लाव्हिया ही राष्ट्रे सामील झाली.
मित्र राष्ट्र गंठबंधनाचे प्रमुख नेते -
अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट, ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल आणि सोव्हिएत युनियनचे जनरल जोसेफ स्टालिन हे या गटाचे महत्त्वाचे सदस्य होते.
दुसरे महायुद्धातील हानी -
दुसरे महायुद्ध इतिहासातील सर्वात घातक युद्ध असल्याचे सिद्ध झाले होते. यात 60 ते 80 मिलियन लोकांचा मृत्यू झाला. यात 6 मिलियन ज्यू नागरिक नाझींच्या हातून मारले गेले. याला होलोकॉस्ट म्हटलं जात. होलोकॉस्ट हा शब्द दुसर्या महायुद्धादरम्यान जर्मनीतील नाझींनी केलेल्या ज्यू लोकांच्या हत्येचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.
दुसऱ्या महायुद्धातील इतर तथ्य -
- स्वित्झर्लंड, स्पेन, पोर्तुगाल आणि स्वीडनने युद्धादरम्यान तटस्थता घोषित केली. दोन्ही गटांना त्यांनी पाठिंबा दिला नाही.
- युद्धाच्या दरम्यान नाझींकडून सुमारे 6 मिलियन ज्यू लोकांना मारले.
- युद्धानंतर 38 देशांना सुमारे 50 अब्ज डॉलर्सची मदत मिळाली.
दुसऱ्या महायुद्धाचा संक्षिप्त घटनाक्रम-
- 1 सप्टेंबर 1939 - पोलंडच्या स्वारीकरिता हिटलरने रशियाबरोबर मैत्री केली आणि पोलंडवर आक्रमण केले. काही दिवसांत त्यांची पोलंडवर ताबा मिळवला. 19 सप्टेंबर रोजी जर्मनी व रशियामध्ये पोलंडची वाटणी झाली. येथूनच अधिकृतरित्या युद्धाला सुरुवात झाली.
- 10 जून 1940 - ब्रिटन आणि फ्रान्सविरुद्ध युद्ध जाहीर करून इटली हा देश जर्मनीच्या बाजूने युद्धात सामील झाला. या काळात ही लढाई ग्रीस आणि उत्तर आफ्रिकेत पसरली.
- 14 जून 1940 - जर्मन सैन्याने पॅरिसकडे कूच केली.
- जुलै 1940 - सप्टेंबर 1940 - जर्मनी आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात इंग्लिश खाडीवर हवाई युद्ध झाले.
- 7 सप्टेंबर 1940 - मे 1941 - जर्मन सैन्यांनी ब्लिट्झ म्हणून ओळखली जाणारी बॉम्बस्फोट मोहीम सुरू केली. ब्लिट्झ युद्धनितीचा वापर करुन जर्मनीने युरोमधील अनेक राष्ट्रांना धुळ चारली. वेग, अचुकता, सैन्य दलातील ताळमेळ आणि योग्य नियोजन ही या नितीची महत्त्वाची वैशिष्ये.
- 22 जून 1941 - जर्मनीने सोव्हिएत युनियनवर आक्रमण केले.
- 7 डिसेंबर 1941 - जपानने पर्ल हार्बर येथील यूएस नेव्ही बेसवर हल्ला केला. यात अमेरिकेचे मोठे नुकसान झाले. याचबरोबर जपानने फिलिपाईन्समधील क्लार्क आणि इबा हवाई क्षेत्रांवरही हल्ला केला. तेथील अमेरिकेच्या लष्करी विमानांपैकी अर्ध्याहून अधिक विमान नष्ट केले.
- 8 डिसेंबर 1941 - पर्ल हार्बवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध जाहीर केले.
- 11 डिसेंबर 1941 - जर्मनी आणि इटलीने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
- 1942 - मित्र राष्ट्रांनी उत्तर आफ्रिका आणि सोव्हिएत युनियनमधील अक्ष राष्ट्रांच्या शक्तींना रोखलं.
- फेब्रुवारी 1942 - जपानने मलय द्वीपकल्पावर आक्रमण केले. तर सिंगापूर एका आठवड्यात शरण आला.
- जून 1942 - मिडवे बेट जिंकण्याचे जपानचे उद्दिष्ट होते. जपानी हालचालींचा सुगावा लागताच अमेरिकी विमानवाहक नौका मिडवेकडे वळल्या. या युद्धात जपानच्या नाविक शक्तीला मोठा धक्का बसला. यानंतर ते अमेरिकी नाविक शक्तीबरोबर मुकाबला करण्यास असमर्थ ठरले.
- 19 ऑगस्ट, 1942 - स्टालिनग्राडची लढाई सुरू झाली.
- ऑगस्ट 1942 - फेब्रुवारी 1943 - अमेरिकन सैन्याने पॅसिफिक बेट ग्वाडालकॅनलसाठी लढा दिला.
- 1 फेब्रुवारी 1943 - जर्मन सैन्याने स्टालिनग्राड येथे आत्मसमर्पण केले.
- 10 जुलै, 1943 - मित्र राष्ट्रांचे सैन्य इटलीत उतरले.
- 25 जुलै, 1943 - मुसोलिनीला पदच्युत करून अटक करण्यात आली.
- नोव्हेंबर 1943- मार्च 1944 - अमेरिकन सैन्यांनी बोगेनविलिया येथील सोलोमन बेटांवर स्वारी करून जपानी लोकांकडून आपले मरीन ताब्यात घेतले.
- 6 जून, 1944 - मित्र राष्ट्राचे सैन्यं नॉरमँडीच्या उटाह, ओमाहा, गोल्ड, जूनो आणि स्वॉर्ड या पाच समुद्रकिनाऱ्यावर उतरलं. यात 5,000 पेक्षा जास्त जहाजे, 11,000 विमाने आणि 150,000 पेक्षा जास्त सैनिक होते.
- 25 ऑगस्ट 1944 - अमेरिकन आणि मुक्त फ्रेंच सैन्याने पॅरिस मुक्त केले.
- 27 जानेवारी, 1945 - सोव्हिएत सैन्याने पोलंडच्या क्राकोजवळील ऑशविट्झ शिबिर परिसर मुक्त केले.
- 19 फेब्रुवारी - 26 मार्च 1945 - अमेरिकन सैन्याने इवो जिमा बेट मुक्त करण्यासाठी जपानी सैन्यांशी लढा दिला.
- 12 एप्रिल 1945 - जॉर्जियाच्या वार्म स्प्रिंग्समध्ये रुझवेल्टचे निधन झाले. त्यानंतर उपराष्ट्रपती हॅरी ट्रूमन यांनी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
- 25 एप्रिल 1945 - सोव्हिएत सैन्याने बर्लिनला वेढा घातला.
- 28 एप्रिल, 1945 - स्वित्झर्लंडला पळून जाण्याच्या प्रयत्नात मुसोलिनी ठार झाला.
- 30 एप्रिल 1945 - हिटलर आणि त्याची पत्नी इवा ब्रौन यांनी आत्महत्या केली.
- 7 मे 1945 - जर्मनीने आयसेनहॉवरच्या मुख्यालयात असलेल्या लाल शाळेत आत्मसमर्पण केले.
- 8 मे, 1945 - युरोपमधील युद्ध अधिकृतपणे संपले. हा दिवस युरोपमध्ये विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण, याच दिवशी युद्धबंदी लागू करण्यात आली.
- 16 जुलै, 1945 - अणुबॉम्बची पहिली यशस्वी चाचणी न्यू मेक्सिकोच्या अलामोगोर्डो येथे झाली.
- 29 जुलै, 1945 - ट्रूमॅनने जपानला चेतावणी दिली, की जर जपानने बिनशर्त शरणागती स्वीकारली नाही. तर जपान उद्ध्वस्त होईल.
- 6 ऑगस्ट , 1945 - युद्धात लिटल बॉय नावाचा पहिला अणुबॉम्ब जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकण्यात आला. ज्यामुळे 140,000 लोक मारले गेले.
- 9 ऑगस्ट , 1945 - हिरोशिमा बॉम्बस्फोटानंतर जपान सरकारकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर पुन्हा दुसरा फॅट मॅन नावाचा अणुबॉम्ब जपानच्या नागासाकी शहरावर टाकण्यात आला. यात 80,000 लोक ठार झाले.
- 14 ऑगस्ट 1945 - अखेर जपानने बिनाशर्त पॉट्सडॅम घोषणेच्या अटी स्वीकारण्यास आणि युद्ध संपवण्यास सहमती दर्शवली.
- 2 सप्टेंबर, 1945 - जपानने टोकियो खाडीतील यूएसएस मिसौरी येथे औपचारिक शरणागतीवर स्वाक्षरी केली.