ETV Bharat / bharat

World Population Day 2021 : जाणून घ्या का साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन - जागतिक लोकसंख्या दिन अपडेट

सन 1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) गव्हर्निंग कौन्सिलनेे 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, सन 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो.

World Population Day 2021
जागतिक लोकसंख्या दिन
author img

By

Published : Jul 11, 2021, 7:54 AM IST

नवी दिल्ली - जगभरात दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. यावर्षी जागतिक लोकसंख्या दिन 2021 ची नवीन थीम "हक्क आणि पर्याय हेच उत्तर आहे : नवीन बाळांच्या जन्माचं प्रमाण कमी असो वा अधिक , सगळ्या लोकांच्या हक्कांना आणि आरोग्याला प्राधान्य देण्यातूनच जन्मदर बदलला जाऊ शकतो. (Rights and Choices are the Answer: Whether baby boom or bust, the solution to shifting fertility rates lies in prioritising all people's reproductive health and rights) अशी आहे.

11 जुलै, 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज बनली होती. त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. या स्वारस्यात दिवसेंदिवस वाढ होत राहिल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले. सन 1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) गव्हर्निंग कौन्सिलनेे 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, सन 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो.

‘जागतिक लोकसंख्या दिननिमित्ताने विविध कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात. लोकसंख्यावाढीमुळे जाणवणार्‍या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सन 2011 मध्ये जागतिक लोकसंख्या 7 अब्जांवर पोहोचली होती. तर 1 जानेवारी, 2014 रोजी जागतिक लोकसंख्या 7 अब्ज 13 कोटी 76 लाख 61 हजार 30 वर पोहोचली होती. सध्या चीन हा सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहे.

लोकसंख्या दिन घोषवाक्ये -

  • कुटुंब असेल लहान.मेरा भारत महान
  • करूया लोकसंख्येचे नियंत्रण,अन्यथा ठरेल अधोगतीस निमंत्रण
  • कुटुंब लहान ,सुख महान
  • आजचे प्रयोजन,कुटुंब नियोजन
  • कुटुंब नियोजनात कसूर,लोकसंख्येचा प्रश्न भेसूर
  • ‘करूया कुटुंबाचे नियोजन आनंदी राहू प्रत्येकजण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.