ETV Bharat / bharat

World Metrology Day 2023 : जाणून घ्या का साजरा करण्यात येतो जागतिक हवामान दिवस, काय आहे पुणे वेधशाळेचा इतिहास - हवामान संशोधन केंद्र

जागतिक हवामान संघटनेची स्थापना २३ मार्च १९५० मध्ये करण्यात आली होती. त्या संघटनेच्या समर्थनार्थ २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुण्यात हवामान संशोधन केंद्र असून त्याला पुणे वेधशाळा असे संबोधले जाते. पुण्यातील हवामान संशोधन केंद्र देशभरातील हवामानाचा अंदाज व्यक्त करते.

World Meteorological Day 2023
पुणे वेधशाळा
author img

By

Published : Mar 23, 2023, 10:18 AM IST

हैदराबाद : जगभरात 23 मार्चला जागतिक हवामान दिवस साजरा करण्यात येत आहे. या दिवशी बदलत्या हवामानाबाबत जनजागृती करण्यात येते. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी पुण्यात वेधशाळा स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे या वेधशाळेच्या माध्यमातून देशभरातील हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात येतो.

कधीपासून साजरा करण्यात येतो हवामान दिन : देशातील हवामान ऋतूमानानुसार बदलत असते. त्याचा परिणाम मानवी जीवनावरही होतो. त्यामुळे देशातील कोणत्या भागातील हवामान कसे असते, याबाबतचा अंदाज व्यक्त करणे गरजेचे असते. त्यासाठी जागतिक पातळीवर कार्यक्रमाची आखणी आणि जनजागृती करण्यासाठी जागतिक हवामान संघटनेची २३ मार्च १९५० ला स्थापना करण्यात आली. या संगटनेच्या समर्थनार्थ २३ मार्च १९६१ मध्ये जागतिक हवामान दिनाची सुरुवात करण्यात आली. जागतिक हवामान संघटनेच्या समर्थनार्थ २३ मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

काय आहे पुणे वेधशाळेचा इतिहास : ब्रिटीश काळात हवामान अंदाज व्यक्त करण्याचे केंद्र शिमला आणि कोलकात्ता येथे होते. मात्र दळणवळणाच्या सोयीसाठी ब्रिटीशांनी ते २० जुलै १९२८ ला पुण्यात हलवले. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील १० एकरात हे हवामान संशोधन केंद्र विस्तारले आहे. हे हवामान संशोधन केंद्र भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अख्त्यारित कार्यरत आहे. पुणे वेधशाळा ही देशभरातील हवामानाचे अंदाज व्यक्त करुन मान्सूनपूर्व अंदाजाचा आराखडा तयार करते.

का म्हणातात शिमला कार्यालय : पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या पुणे वेधशाळेला शिमला ऑफिस असे संबोधल्याने अनेकांचा गैरसमज होतो. पुण्यात शिमला ऑफिस कसे, असा प्रश्नही नागरिकांना पडतो. मात्र पुणे वेधशाळेचे हे कार्यालय शिमल्यावरुन १९२८ ला पुण्यात आणण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यालयाला शिमला ऑफिस असेच संबोधले जाते. पुणे वेधशाळेची ही ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूच्या परिसरातच कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत.

हेही वाचा - World Forest Day 2023 : वृक्षवल्ली आम्हा सोयरे, पण तरी होते दरवर्षी 'इतक्या' वृक्षाची कत्तल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.