ETV Bharat / bharat

Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकाचं कायद्यात रुपांतर, सरकारची अधिसूचना जारी - महिला आरक्षण

महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिलीय. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची संमती मिळाल्यानंतर भारत सरकारनं महिला आरक्षण विधेयकासाठी राजपत्र अधिसूचना जारी केली आहे.

Women Reservation Bill
Women Reservation Bill
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 10:55 PM IST

नवी दिल्ली : संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केलेले महिला आरक्षण विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूरी दिली आहे. त्यानंतर या विधेयकाचं आता कायद्यात रुपांतर झालंय. नारी शक्ती वंदन कायदा, लोकसभा तसंच राज्य विधानमंडळांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण प्रदान करतो. नारी शक्ती विधेयकग संसदेच्या दोन्ही सभागृहानी एकमतानं मंजूर होतं. नवीन संसदेच्या सभागृहात मंजूर होणारे हे पहिलं विधेयक ठरलंय.

नारी शक्ती विधेयकाचं कायद्यात रुपांतर : 20 सप्टेंबर रोजी हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. 454 सदस्यांनी नारी शक्ती वंदन विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं होतं. तर विधेयकाच्या विरोधात दोन सदस्यांनी मतदान केलं होतं. यावेळी विरोधी सदस्यांनी मांडलेल्या दुरुस्त्या नाकारण्यात आल्या होत्या. 21 सप्टेंबर रोजी, नारी शक्ती वंदन कायदा राज्यसभेत एकमतानं मंजूर करण्यात आला होता.

मोदींचं केलं अभिनंदन : त्यानंतर ते विधेयक राष्ट्रपतीकडं मंजूरीसाठी पाठवण्यात आलं होतं. राष्ट्रपतीनं या विधेयकाला मंजूरी दिल्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रुपांतर करण्यात आलं आहे. पीटी उषा, केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी, स्मृती इराणी यांच्यासह संसदेच्या दोन्ही सभागृहातील महिला सदस्यांनी संसदेत विधेयक संमत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुष्पगुच्छ दिलं होतं. राज्यसभेनं यापूर्वी 2010 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात महिला आरक्षण विधेयक मंजूर केलं होतं. परंतु विधेयक संख्येअभावी मंजूर होऊ शकलं नव्हतं.

महिलांसाठी मजबूत प्रतिनिधित्व : या विधेयकावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, संसदेत नारी शक्ती वंदन कायदा देशातील महिलांसाठी मजबूत प्रतिनिधित्व, सक्षमीकरणाच्या युगाची सुरुवात करेल. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हणाले की, 'आपल्या देशाच्या लोकशाही प्रवासातील एक निर्णायक क्षण! 140 कोटी भारतीयांचे अभिनंदन, असं मत व्यक्त केलं होतं. त्यांनी पुढे लिहिलं की, 'नारी शक्ती वंदन कायद्यासाठी मतदान करणाऱ्या सर्व राज्यसभा खासदारांचे मी आभार मानतो. संसदेत नारी शक्ती वंदन कायदा मंजूर झाल्यामुळं, आम्ही भारतातील महिलांसाठी मजबूत प्रतिनिधित्व सक्षमीकरणाचं युग सुरू करतोय. हा केवळ कायदा नाही, तर ज्या असंख्य महिलांनी आपला देश घडवला त्यांना ही अदरांजली असल्याचं मोदी म्हणाले होते.

महिला सक्षमीकरणाची इतिहासात नोंद : 'महिलांच्या योगदानामुळं भारत समृद्ध झाला आहे. आज आपण उत्सव साजरा करत असताना, आपल्या देशातील सर्व महिलांच्या शक्ती, धैर्य, अदम्य आत्म्याची आठवण करून दिली जाते. त्यांचे आवाज आणखी प्रभावीपणे ऐकले जातील, याची खात्री करण्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल आहे. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनीही हे विधेयक मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक केलं. महिला सक्षमीकरणासाठी इतिहासात याची नोंद होईल, असं त्यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा -

  1. Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी सर्व पक्षांच्या प्रयत्नांचा गर्व वाटला पाहिजे - सरन्यायाधीश
  2. Rahul Gandhi On Modi : जात जनगणनेच्या बहाण्याने महिला विधेयकाची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याचा मोदी सरकारचा डाव - राहुल गांधी
  3. Women Reservation Bill : लोकसभेनंतर आज राज्यसभेत होणार महिला आरक्षण विधेयकावर चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.