नागरकुर्नूल - जिल्ह्यातील थिम्माजीपेटा जवळच्या नेरेल्लापल्ली येथे आपल्या बाळाला स्तनपान करताना आईचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर जवळच्या तिरमलापूर गावातील जयश्री (25) ही दोन महिन्यांपूर्वी पहिल्या प्रसूतीसाठी नेरेल्लापल्ली येथील प्रसूती रुग्णालयात आली होती. तिने एका मुलीला जन्म दिला. जयश्रीचा पती प्रशांतने शनिवारी जयश्रीची तब्येत थोडीशी अस्वस्थ असल्याने त्यांनी तिला महबूबनगर येथील खासगी रुग्णालयात नेले. तिच्या हृदयाच्या झडपात किरकोळ समस्या आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर औषधोपचार करुन तिला पुन्हा नेरेल्लापल्ली येथे आणण्यात आले.
रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास जयश्री आपल्या बाळाला दूध पाजत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच तिचा मृत्यू झाला. थोड्या वेळाने आजोबा आणि आजीने तिला चहासाठी बोलावले पण ती उठली नाही. त्यांना संशय आल्याने तपासणी केली. तर ती मृतावस्थेत आढळून आल्याने त्यांना धक्काच बसला. जयश्रीचे आई-वडील आणि सासरच्या मंडळींनी तामिळनाडूला यात्रेसाठी गेल्याने वृध्दांनी तात्काळ तिच्या घरी असलेल्या पतीला माहिती दिली.