नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यापासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले. काही शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर 'निशाण ए साहिब ध्वज' फडकवल्यानंतर वादंग सुरू झाले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या घटनेबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केलं. प्रजासत्ताक दिनी झालेल्या तिरंग्याच्या अपमानानं देश दुःखी झाला, असं मोदी म्हणाले. त्यावर राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या व्यक्तीने तिरंग्याचा अपमान केला. त्या व्यक्तीला पकडा, असे टिकैत म्हणाले.
तिरंगा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाही. संपूर्ण देश तिरंग्यावर प्रेम करतो. ज्याने तिरंग्याचा अपमान केला. त्याला सरकारने पकडावं, असं राकेश टिकैत म्हणाले.
26 जानेवारी रोजी जे काही घडले, ते एका षडयंत्रातून झाले. यावर व्यापक चौकशी व्हायला हवी. आम्ही तिरंग्याचा कधीही अपमान करू देणार नाही. तिरंग्याचा मान नेहमी उंच आहे. त्याचा अपमान आम्हीही खपवून घेणार नाही, असेही टिकैत म्हणाले.
तुरूंगात टाकलेल्या शेतकऱ्यांना सोडण्यात यावे. त्यानंतर चर्चा होईल. पंतप्रधानांनी पुढाकार घेतला आहे. ते सरकार आणि आमच्यात दुवा बनले आहेत. शेतकऱ्यांच्या पगडीचा देखील सन्मान केला जाईल आणि देशाचे पंतप्रधान यांचाही, असे टिकैत म्हणाले.
काय प्रकरण -
शेतकरी आंदोलकांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंग्यापासून लांब आणखी एक झेंडा फडकावला. याची जबाबदारी दीप सिद्धू यांनी स्वीकाली. त्या झेंड्याला ‘निशाण ए साहिब’ म्हणातात. तसेच त्या झेंड्यावरील चिन्हाला ‘खंडा’ असं म्हटलं जातं. या झेंड्यामध्ये दोन कृपाण, दुधारी तलवार, आणि एक चक्र आहे. शिख धर्मातील खालसा पंथाचा तो झेंडा होता. लालकिल्ल्यावर 'निशाण ए साहिब’ साहिब ध्वज फडकावल्यानंतर वादंग सुरू झाले आहे.