पणजी: गोवा हा अनेक वर्षे काॅंग्रेसचा गड (Goa Congress stronghold) होता. 2017 च्या निवडणुकीत काॅग्रेसमधुन आलेल्या अर्ध्या आमदारांच्या जोरावरच भाजपने तेथे सरकार स्थापन केले. काॅंग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले दिगंबर कामत (Former Chief Minister Digambar Kamat) यांनी विरोधीपक्ष नेत्याची जवाबदारी पार पाडली यावेळी ते मडगाव मतदारसंघातून सहाव्यांदा लढत आहेत. काॅंग्रेसची देशभर पडझड झालेली असली तरी काॅंग्रेसला गोव्यात मोठा जनाधार आहे असे वाटते. आप, तृणमुल काॅंग्रेल, यांनी या वेळी निवडणुकीत आव्हान दिले असले तरी अनेक मतदार संघात काॅंग्रेस विरुध्द भाजप अशी थेट लढत असल्याचे सांगण्यात येते.
मायकल लोबो यांचा काॅंग्रेस प्रवेश आणि बदलणाऱ्या समिकरणात काॅंग्रेसला मोठ्या आशा आहेत. या सगळ्या प्रवासात काॅंग्रेस पक्षात महत्वाची भुमीका बजावणारे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे मडगाव मतदारसंघातून सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांचा जन्म ८ मार्च १९५४ रोजी मडगाव येथे झाला. ते जून 2007 ते मार्च 2012 पर्यंत गोव्याचे मुख्यमंत्री होते. 2006 पासून ते भारतीय जलतरण महासंघाचे अध्यक्ष आहेत. सध्या ते गोवा विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहत आहेत. ते विज्ञान पदवीधर (बीएससी)आहेत.
दिगंबर वसंतराव कामत यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. 1994 मध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या आघाडी सरकारमध्ये सामील झाले. 2005 मध्ये, त्यांनी पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2007-2012 च्या पूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करण्यासाठी त्यांची निवड झाली. कामत यांनी 1994, 1999, 2002 (भाजप सदस्य म्हणून), 2007, 2012 आणि 2017 (काँग्रेस सदस्य म्हणून) सलग सहा वेळा मडगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 17 जुलै 2019 रोजी, दिगंबर कामत यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोवा विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. तो पोहणे आणि बॅडमिंटनचे निस्सीम प्रेमी आहेत. त्यांचा विवाह आशा यांच्या सोबत झाला असून त्याला दोन मुले आहेत.