ETV Bharat / bharat

husband killed wife पत्नी रील बनवायची, त्याने रागाच्या भरात गळा आवळून पत्नीची केली हत्या

बिहारच्या भोजपूरमध्ये पतीने पत्नीला जीवे ( husband killed wife in bhojpur ) मारले. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पतीला पत्नीचे रील बनवणे पसंत नव्हते, याच्या रागातून त्याने असे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

husband killed wife
husband killed wife
author img

By

Published : Sep 27, 2022, 7:40 PM IST

Updated : Sep 27, 2022, 8:54 PM IST

आराह : बिहारच्या भोजपूरमध्ये घरगुती वादातून ( domestic discord in bhojpur ) पतीने पत्नीचा गळा दाबून खून ( husband killed wife in bhojpur ) केला. ही घटना नवादा पोलीस स्टेशन हद्दीतील अनिथ परिसरातील आहे. अन्नू खातून असे मृत महिलेचे नाव असून ती जगदीशपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. दरम्यान, ही महिला सोशल मीडियासाठी रील बनवायची, जी तिच्या पतीला आवडत नसल्याचं या प्रकरणात समोर आलं आहे.

रील बनवण्याच्या कारणावरून पतीने पत्नीची हत्या केली : अनिल आणि त्याच्या पत्नीमध्ये रील बनवण्यावरून वारंवार भांडण होत असे. रविवारीही याबाबत चर्चा झाली होती. अनिलने पत्नीला मोबाईलमधून सोशल मीडिया अॅप डिलीट करण्यास सांगितले पण तिने तसे करण्यास नकार दिला. यानंतर संतापलेल्या अनिलने रागाच्या भरात गमछाने तिचा गळा आवळला. त्यातच तिचा मृत्यू झाला.

रात्रभर पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून होता पती : रात्री उशिरा पत्नीचा गळा आवळून पत्नीची हत्या केल्यावर तो पळून मात्र गेला नाही. रात्रभर पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. सकाळी या घटनेची माहिती नवादा पोलीस ठाण्यात मिळाली. त्यानंतर नवादा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन आरोपी पतीला अटक केली.

दोघांचे होता प्रेमविवाह : जगदीशपूर पोलीस स्टेशन परिसरातील आयर येथील अन्नू खातून यांचा विवाह १० वर्षांपूर्वी ऐठ येथील शिवशंकर चौधरी यांचा मुलगा अनिल चौधरी याच्याशी झाला होता. दोघांमध्ये प्रेमविवाह झाला होता. पती-पत्नी दोघेही बाहेर राहत असत पण काही वर्षांनी दोघेही वडिलांच्या घरी संपूर्ण कुटुंबासह राहू लागले.

पत्नीची हत्या करणाऱ्या अनिल चौधरीचे वडील शिवशंकर चौधरी यांनी सांगितले की, रील बनवण्यावरून मुलगा आणि सून यांच्यात सतत वाद होत होते. सून अन्नू मोबाईलवर तिचा व्हिडिओ बनवून लोकांमध्ये शेअर करायची. यावर अनिलचा आक्षेप होता आणि त्याने अनेक वेळा पत्नीला रील बनवू नका असे सांगितले होते.

रविवारी रात्री मुलगा आणि सून घराच्या दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत झोपायला गेले. ते त्यांच्या पत्नीसोबत खाली खोलीत झोपले. सोमवारी सकाळी माझी पत्नी दुसऱ्या मजल्यावर साफसफाईसाठी गेली तेव्हा, सुनेच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे तिने पाहिले. अनेकवेळा आवाज देऊनही कोणी दरवाजा न उघडल्याने गेट ढकलून उघडले. आत अन्नूचा मृतदेह पडला होता आणि अनिलही बसला होता. त्याच्या आईने चौकशी केली तेव्हा अनिलने पत्नीची हत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली, असे शिवशंकर चौधरी यांनी सांगितले.

Last Updated : Sep 27, 2022, 8:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.