ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याची 75 वर्षे : जालियनवाला बाग हत्याकांड नेमकं का घडलं, जाणून घ्या... - जालियानवाला बाग हत्याकांड का घडल

जालियनवाला बाग हत्याकांड ही भारतीय स्वातंत्र्याचा लढातील एक महत्त्वाची घटना. त्यांच्या खुणा आजही जालियनवाला बागेत बघायला मिळतात. आज आपण स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात प्रवेश करताना ब्रिटीश सरकाच्या या क्रूर कारवाईत प्राण गमावलेल्या या निष्पाप भारतीयांचे स्मरण करूया.

Jallianwala Bagh massacre
Jallianwala Bagh massacre
author img

By

Published : Sep 4, 2021, 5:54 AM IST

Updated : Sep 4, 2021, 1:32 PM IST

हैदराबाद - भारतीय स्वातंत्र्याचा लढातील एक महत्त्वाची घटना म्हणजे 13 एप्रिल 1919 रोजी झालेला जालियनवाला बाग हत्याकांड. या हत्याकांडात अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यांच्या खुणा आजही जालियनवाला बागेत बघायला मिळतात. आज आपण स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात प्रवेश करताना ब्रिटीश सरकाच्या या क्रूर कारवाईत प्राण गमावलेल्या या निष्पाप भारतीयांचे स्मरण करूया.

जालियानवाला बाग हत्याकांड नेमकं का घडलं, जाणून घ्या...

जालियनवाला बागेत झालेल्या हत्याकांडाने भारतीय स्वातंत्र चळवळीत एक महत्त्वाची भूमिका बजावली होती. या हत्याकांडाने स्वातंत्र्याचा संघर्ष अधिक तीव्र केला. पण हे हत्याकांड नेमकं का घडले. हे समजून घेण्याआधी यापूर्वी बऱ्याच घटना समजून घ्यावा लागतील.

1913चे गदर आंदोलन आणि 1914च्या कोमागाटा मारू या घटनेने पंजाबमधील लोकांमध्ये क्रांतीची सुरू झाली. तसेच 1914मध्ये सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धात ब्रिटीश सैन्यांत 1 लाख 95 हजार भारतीय सैनिकांचा समावेश होता. यापैकी 1 लाख 10 हजार सैनिक हे पंजाबचे होते. या सैनिकांनी जग पाहिले असल्याने देश ही संकल्पना म्हणजे नक्की काय, हे त्यांना चांगलेच माहिती होते. त्यामुळे या सैनिकांनी बंड केले, तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल, अशी भीती ब्रिटीशांना होती. अशावेळी त्यांना रोखण्यासाठी ब्रिटीश सरकारकडे असे कोणतेही कडक कायदे नव्हते. पंजाबमधील बदलते वातावरण बघता, ब्रिटीशांना एका कडक कायद्याची आवश्यकता होती, त्यादृष्टीने त्यांचा प्रयत्नही सुरू होता. हा नवा कायदा म्हणजे रौलेट कायद्या. जेव्हा ब्रिटीश सरकारने या कायद्यासंदर्भात चर्चा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी या कायद्याला प्रचंड विरोध झाला. माध्यमांमध्ये या विरोधाचा तपशील प्रकाशित करण्यात आला होता.

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : झारखंडमधील आदिवासींसमोर झुकले होते ब्रिटिश, वाचा सविस्तर...

या काळ्या कायद्याविरोधात सत्याग्रहाच्या माध्यमातून देशभरासह पंजाबच्या अनेक भागांमध्ये निदर्शने झाली. तसेच अमृतसरमध्येही नियोजित निदर्शने चालू होती. या आंदोलनाचे नेतृत्त्व दोन व्यक्ती करत होते. एक म्हणजे डॉ. सत्यपाल मलिक आणि दुसरे म्हणजे डॉ. सफुद्दीन किचलू. या दोघांनी महात्मा गांधी यांना या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली. त्यानुसार गांधीजी पंजाबच्या दिशेने रवानाही झाले होते. मात्र, त्यांना पलवल येथे रोखण्यात आले. त्यामुळे महत्मा गांधी या आंदोलना सहभागी होऊ शकले नाही. या सगळ्या दरम्यान, 18 मार्च 1919 रोजी रॉलट कायदा पास करण्यात आला. तसेच 10 एप्रिल रोजी डॉ. सत्यपाल मलिक सफुद्दीन किचलू यांना अटक करण्यात आली. मात्र, त्यांना अमृतसरमध्ये न ठेवता, धर्मशाला येथे पाठवण्यात आले.

दोघांच्या अटकेनंतर अमृतसरमध्ये तणाव वाढत गेला. कटरा, हॉल बाजार परिसरात 20 हजार पेक्षा जास्त लोकांनी निदर्शने केली. वाढता तणाव आणि वाढत्या हिंसक घटना बघता पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओ'डॉयर यांनी जालंधर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे लष्करी अधिकारी जनरल डायरला फोन करून त्याला जालंधर येथून बोलावण्यात आले. त्याचे भारतीय लोकांबद्दल एक विचित्र मतं होते. त्याला वाटायचे की भारतीयांनी ब्रिटिशांशी असभ्य वर्तन करू नये. कारण हा ब्रिटीशांचा देश आहे आणि येथे भारतीय फक्त कीटकांसारखे आहेत.

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या एक दिवस आधी, जनरल डायरने आपल्या संपूर्ण सशस्त्र दलांसह अमृतसरच्या दिशेने कूच केली आणि तेथे कर्फ्यूची घोषणा केली. मात्र, 90 टक्के लोकांना मार्शल कायदा किंवा कर्फ्यू लावला गेला आहे, याची कल्पना नव्हती. त्यांनी मोजक्या लोकांनाच यांची माहिती दिली होती. कर्फ्यूची माहिती नसल्याने अनेक लोक जालियनवाला बागेत सभेसाठी जमले होते. या व्यतिरिक्त, बैसाखीच्या दिवशी, बाहेरुन आलेली मंडळी श्रद्धांजली देण्यासाठी श्री हरमंदिर साहिबला येथे पोहोचली होती. गोबिंदगड पशु मेळ्यात सहभागी होण्यासाठी आलेले व्यापारीही तेथे उपस्थित होते. मात्र, खुशहाल सिंह, मोहम्मद पेहलवान आणि मीर रियाज-उल-हसन हेरगिरी करत होते आणि क्षणोक्षणी माहिती जनरल डायरला देत होते.

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : राणी अवंतीबाईंचा ब्रिटिश साम्राज्याविरोधातील विस्मरणात गेलेला लढा, जाणून घ्या..

या ठिकाणी स्थानिक मुले, महिला आणि वडील हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमासाठी भोंगे लावण्यात आले होते. सकाळपासून तयारी चालू होती. अनेक जण तर तेथे भोंगे का लागले हे बघायला गेले होते. 90 टक्के लोकांना तेथे कोणती सभा आहे. याबाबत माहिती नव्हती. दुपारी 1च्या सुमारास तेथे लोक जमू लागली होती. या सर्व बातम्या जनरल डायरपर्यंत पोहोचत होत्या. चार साडेचार वाजता ठरलेली बैठक, प्रचंड गर्दी झाल्याने दुपारी तीन वाजताच सुरु करण्यात आली. पाच सव्वापाचच्या सुमारास जनरल डायर 25 सैनिकांच्या ४ तुकड्यांसह जालियनवाला बागला पोहोचला. गर्दी बघून त्याने लगेच गोळीबार करण्याचे आदेश दिले.

ज्या क्षणी दुर्गा दासने आपले भाषण सुरू केले, गोळीबार सुरू झाला. लोकांना चेतावणी देण्यासाठी किंवा पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला नाही. लोकांवर अंदाधुंद गोळ्या चालवण्यात आल्या. काय घडले समजायला एक ते दीड मिनीटं गेली. यावेळी 1650 राऊंड फायर करण्यात आले. या परिसरात एक विहीर होती. महिला आणि मुलांनी विहीरीत उडी मारली. ती विहीर मृतदेहांनी भरली होती. एका बाजूला सुलतान दरवाजा होता. लोकांनी त्यावरून चढण्याचा प्रयत्न केला. ज्या क्षणी त्यांनी उडी मारायचा प्रयत्न केला. त्यांचे मृतदेह दुसऱया बाजूला पडत होते. मृतदेहांच्या ढिगामुळे एक बाजू जाम झाली होती. तेथे उधम सिंह नावाचा एक मुलगा होता. तो झाडाखाली लपल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेनंतर संपूर्ण अमृतसर शहर शांत होते. या गोळीबारानंतर जखमींना पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही. त्यांना पाणी किंवा वैद्यकीय मदत वेळेवर मिळाली असती. तर अनेकांचे प्राण वाचले असते.

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : दांडीनंतर ओडिशातील इंचुडी इथेही झाला होता मिठाचा सत्याग्रह, जाणून घ्या सविस्तर...

त्यावेळचे पंजाबचे मुख्य सचिव जेपी थॉमसन लिहितात, की या घटनेत 291 लोक मारले गेले. त्यापैकी 211 अमृतसर शहरातील होते. शिकारी समितीने 379 लोक मारले गेल्याचे सांगितले. हे समजून घेणं आवश्यक आहे की 275 लोक गोळ्यांनी मरण पावले, तर 104 मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले होते. मदन मोहन मालवीय चौकशी समितीने 1000 लोक मारले गेले असल्याचे म्हटले. काँग्रेसच्या चौकशी समितीने सांगितले की 1200 लोक मारले गेले आणि 2600 जखमी झाले. स्वामी श्रधानंददेखील तेथे गेले आणि ते म्हणाले की 1500 लोक मरण पावले. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या एक हजार ते पंधराशेच्या दरम्यान आहे.

भारतीयांच्या आक्रोशानंतर, ब्रिटीश सरकारला जनरल डायरला निलंबित करावे लागले, ते शांतपणे ब्रिटनला परतले. शहीद उधम सिंगने 13 मार्च 1940 रोजी लंडनमध्ये मायकेल ओ'डायरवर गोळीबार करून हत्याकांडाचा बदला घेतला. 1961 मध्ये, भारत सरकारने दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी स्मारक उभारले, ज्याचे उद्घाटन माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केले.

Last Updated : Sep 4, 2021, 1:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.