ETV Bharat / bharat

कोरोना मृतांच्या सरकारी आकडेवारीवर प्रश्नचिन्ह का? वाचा भयावह वास्तव... - कोरोनाची भयावह आकडेवारी

देशात दररोज समोर येणारी कोरोनाग्रस्तांची आकडेवारी भयावह आहे. गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने 2 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. तर हजारहून अधिक मृत्यूंची नोंद होत आहे. सरकारकडून ही आकडेवारी जाहीर केली जात आहे. मात्र वास्तव जरा वेगळे आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सरकारी आकडेवारीपेक्षा अधिक आहे. याविषयी संपूर्ण जाणून घेण्यासाठी वाचा हा रिपोर्ट...

कोरोना मृतांच्या सरकारी आकडेवारीवर प्रश्नचिन्ह का? वाचा भयावह वास्तव...

author img

By

Published : Apr 17, 2021, 9:43 AM IST

Updated : Apr 17, 2021, 12:44 PM IST

हैदराबाद : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. दररोज नव्या रुग्णसंख्येची आणि मृतांची विक्रमी आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे सुमारे 2 लाख 17 हजार नवे रुग्ण आढळले तर 1185 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना मृतांची संख्या सातत्याने वाढत असली तरी मृतांच्या आकडेवारीवरच आता संशय व्यक्त केला जात आहे. ईटीव्ही भारत ने या आकडेवारीवरील ग्राऊंड रिपोर्टच्या आधारे तीन महत्वाचेप प्रश्न उपस्थित केले आहेत. तत्पूर्वी देशातील तीन राज्यांमधील मृतांची सरकारी आकडेवारी आणि स्मशानभूमीच्या आकडेवरील तफावत बघितली तर या आकडेवारीविषयीचा संशय आणखीनच बळावतो.

मध्य प्रदेशातील आकडेवारी
मध्य प्रदेशातील आकडेवारी

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,166 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 53 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात सरासरी इतकेच रुग्ण समोर येत आहेत. मात्र मृतांच्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला जात आहे. मध्य प्रदेशात सरकारी आकडेवारीनुसार 12 एप्रिल रोजी 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर भोपाळमधील स्मशानभूमीच्या आकडेवारीनुसार तेथे याच दिवशी 58 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याच दिवशी छिंदवाडामध्येही 37 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही शहरांतच या दिवशी 74 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही आकडेवारी त्या दिवशीच्या सरकारी आकडेवारीपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे ही राज्यातील केवळ दोनच स्मशानभूमीतील आकडेवारी आहे.

दिल्लीची आकडेवारी
दिल्लीची आकडेवारी

दिल्ली

राजधानी दिल्लीतही कोरोनाचा कहर सुरू आहे. 24 तासांत दिल्लीत 16699 नवे रुग्ण आढळले, तर 112 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिल्लीत सध्या 54,309 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. राजधानीतही मृतांच्या आकडेवारीविषयी संशय व्यक्त केला जात आहे. दिल्लीत 12 एप्रिलच्या आकडेवारीनुसार दक्षिण दिल्ली महापालिकेतील स्मशानभूमींमध्ये 43 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दिल्ली महापालिकेच्या स्मशानभूमीत 40 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही महापालिकांच्या स्मशानभूमीत या दिवशी 83 मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले. तर सरकारी आकडेवारीनुसार केवळ 72 जणांचा मृत्यूची नोंद दिल्लीत या दिवशी करण्यात आली आहे.

छत्तीसगडमधील आकडेवारी
छत्तीसगडमधील आकडेवारी

छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये 24 तासांत 15256 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 105 मृत्यूंची नोंद झाली आहे. दिल्ली, मध्य प्रदेशप्रमाणेच छत्तीसगडमधील मृतांच्या आकडेवारीवरही संशय व्यक्त केला जात आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या छत्तीसगडच्या दुर्गमध्ये 13 एप्रिलच्या आकडेवारीनुसार 61 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर या दिवशीच्या सरकारी आकडेवारीनुसार संपूर्ण राज्यात 73 मृत्यूंची नोंद आहे.

आकडेवारीत तफावतीचा आरोप

महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना मृतांची सरकारी आकडेवारी आणि स्मशानभूमीत करण्यात आलेले अंत्यसंस्काराची आकडेवारी यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. 8 आणि 9 एप्रिल रोजी एकूण 91 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र, सरकारी आकडेवारी पूर्णपणे वेगळी असून 9 एप्रिलला केवळ 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्हाचे मनसे अध्यक्ष नितीन भुतरा यांनी आरोप केला आहे की, दररोज 40 ते 50 रुग्णांचा मृत्यू होत असून सरकारी आकडेवारी वेगळेच चित्र दाखवत आहे.

आकडेवारीतील तफावतीवर प्रश्नचिन्ह

छत्तीसगडचे उदाहरण पाहिले तर राज्यात 28 जिल्हे आहेत. सरकारी आकडेवारीनुसार 13 एप्रिल रोजी संपूर्ण राज्यात 73 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. तर याच दिवशी दुर्गमधील स्मशानभूमीत 61 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यापैकी काही जणांच्या मृत्यूंमागील कारण इतरही असू शकेल हे मान्य. मात्र ज्या पद्धतीने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे आणि इतर शहरांतून कोरोना मृतांच्या बातम्या येत आहेत. त्यावरून सरकारी आकडेवारीवर नक्कीच उपस्थित केले जात आहे. मध्य प्रदेश आणि दिल्लीच्या आकडेवारीवरूनही हेच दिसून येत आहे.

ईटीव्ही भारतचे तीन प्रश्न
ईटीव्ही भारतचे तीन प्रश्न

ईटीव्ही भारतचे प्रश्न

स्मशानभूमी आणि सरकारी आकडेवारीतील तफावतीविषयी ईटीव्ही भारतने 3 प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर राज्य तसेच केंद्र सरकारने स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. हे प्रश्न असे आहेत.

  1. मृतांच्या आकडेवारीत तफावत का?
  2. मृतांची आकडेवारी लपविली जात आहे का?
  3. आकडेवारी एकत्रित करण्यात समन्वयाचा अभाव आहे का?

या प्रश्नांवर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कारण 2020 पासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Last Updated : Apr 17, 2021, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.