ETV Bharat / bharat

Jinnah Tower in Guntur : 'जिन्ना टॉवर' ला दिला तिरंग्याचा रंग; वाचा इतिहास काय सांगतो... - जिन्ना टॉवरला तिरंग्याचा रंग

आंध्र प्रदेशातील 'जिन्ना टॉवर' ला ( jinnah tower in Andhra Pradesh ) तिरंग्याचा रंग देण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनी या इमारतीवर हिंदू वाहिनीच्या लोकांनी तिरंगा फडकवण्याचा हट्ट धरला होता. त्यावरून बरेच प्रकरण पेटले होते. भारतात जिन्ना यांच्या नावाचे हे एकमेव स्मारक आहे. या जिन्ना टॉवरचा एक रंजक इतिहास आहे. जाणून घ्या याविषयी...

जिन्ना टॉवर
Jinnah Tower in Guntur
author img

By

Published : Feb 2, 2022, 12:50 PM IST

चेन्नई - आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात पाकिस्तानचे संस्थापक आणि देशाच्या फाळणीचे खलनायक असलेले मोहम्मद अली जिन्ना ( jinnah tower in Andhra Pradesh ) यांच्या नावाचे एक टॉवर आहे. सध्या हे टॉवर ( Guntur's Jinnah Tower ) चर्चेत आहे. प्रजासत्ताक दिनी या इमारतीवर हिंदू वाहिनीच्या लोकांनी तिरंगा फडकवण्याचा हट्ट धरला होता. त्यावरून बरेच प्रकरण पेटले होते. आता त्या टॉवरला तिरंग्याचा रंग देण्यात आला आहे.

जिन्ना टॉवर तिरंग्यात रंगवल्यानंतर आता त्यावर तिरंगा फडकावण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. जिन्ना टॉवरवर तिरंगा फडकवण्यात यावा, अशी मागणी विविध संघटनांनी केली होती. टॉवर तिरंग्यात रंगवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गुंटुर पूर्वचे आमदार मोहम्मद मुस्तफा ( YSRCP MLA Mohammad Mustafa ) यांनी सांगितले.

स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांविरूद्ध काही मुस्लिमांनी लढा दिला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही मुस्लिम देश सोडून पाकिस्तानमध्ये गेले. पण आम्ही देशातच राहणं पसंत केलं. आमचं मातृभूमीवर प्रेम आहे, असे मोहम्मद मुस्तफा यांनी म्हटलं.

टॉवरला अब्दुल कलामांचे नाव द्या -

गेल्या डिसेंबर महिन्यातदेखील हे टॉवर चर्चेत आलं होतं. आंध्र प्रदेश भाजपाने गेल्या डिसेंबर महिन्यात गुंटुर महानगर पालिकेकडे जिन्हा टॉवरचं नाव बदलण्याची मागणी केली होती. टॉवरचे नाव माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम असे करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केली होती.

टॉवरचा रंजक इतिहास -

जिन्ना टॉवरचा एक रंजक इतिहास आहे. महात्मा गांधी रोडवर हे टॉवर उभा आहे. भारतात जिन्ना यांच्या नावाचे हे एकमेव स्मारक आहे. असे म्हटलं जातं, की 1945 मध्ये फाळणीपूर्वी जिन्ना एका सार्वजनिक सभेला संबोधित करण्यासाठी गुंटूरला आले होते. तेव्हा स्थानिक मुस्लिमांनी त्यांच्या नावावर एका मिनाराचे नाव ठेवले. या टॉवरला घुमटाच्या आकाराची रचना असलेले सहा खांब आहेत. तसेच स्थानिक लोक ते सौहार्द आणि शांततेचे प्रतीक मानतात. एवढेच नाही तर या जागेला जिन्ना सेंटर म्हणूनही ओळखले जाते. हे टॉवर शहराची ओळख असून ही इथली हेरिटेज वास्तूही आहे.

हेही वाचा - जिनांच्या घरावर बाळासाहेबांचं स्मारक झालं असतं, तर हिंदुस्तानवासी खुश झाले असते - निलेश राणे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.