ETV Bharat / bharat

Diwali Celebration : बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीची पूजा का करतात? पाडवा म्हणजे काय? जाणून घ्या...

author img

By

Published : Oct 11, 2022, 7:08 PM IST

दिवाळी हा हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीराजाला कपटाने जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम (Why is Bali worshiped day of Balipratipada) स्वीकारले, अशी अख्याईका आहे. या दिवसाला 'बलिप्रतिप्रदा' तसेच 'दिवाळी पाडवा' (what is Padwa) असे देखील म्हणतात. Diwali Celebration

Diwali Celebration
बलिप्रतिप्रदा व पाडवा

यंदाची दिवाळी (Diwali 2022) चार दिवसांची आहे. आणि यामध्ये शेवटचा दिवस म्हणजेच बलिप्रतिप्रदेचा (Balipratipada 2022). दिवाळीत येणारी तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा शेवटचा दिवस असतो. या दिवसाला 'दिवाळी पाडवा' (what is Padwa) असे देखील म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. हिंदू धर्मियांचा हा एक मोठा सण आहे. या दिवशी बळीराजाचे रांगोळीने चित्र काढतात आणि त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो' (Why is Bali worshiped day of Balipratipada) असे म्हणतात.

इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो : बलिप्रतिपदेतला बळिराजा हा शेतकरी राजा होता. त्याला तीन पावले जमिन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात. "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे. हा सण मुळात कृषी संस्कृतीतून आलेला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या दिवसाचं खूप महत्त्व आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीची पूजा करायची प्रथा आहे. त्यासाठी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते. बळीची प्रार्थना केली जाते.

काय आहे आख्यायिका : शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात आणि एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात आणि ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला 'शुभा' असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत्सर सुरू होतो.

पौराणिक कथा : बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार, पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती‌. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही त्याने पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.

वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली. तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. आणि वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. 'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो.

दिवाळी पाडवा : या दिवसाला 'दिवाळी पाडवा' (what is Padwa) असे देखील म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. विक्रम संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. ह्या दिवशी सर्वांनी पहाटे अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत अशी पूर्वापार चालत आलेली रीत आहे. ह्या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची, तसेच त्यावेळी पतीने आपल्या एखादी भेटवस्तू ‘ओवाळणी’ म्हणून देण्याची, एक गोड प्रथा आजही घराघरांमधून आवर्जून पाळली जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.