ETV Bharat / bharat

Dussehra 2022 : नाभीत बाण मारल्यावरचं का सोडले रावणाने प्राण?, काय होते त्या बाणाचे नाव... - नाभीत बाण मारल्यावरचं का सोडले रावणाने प्राण

रामायणाची चर्चा आहे आणि रावणाचा उल्लेख नाही हे कसे होऊ शकते; असे म्हणतात की रावणाची दुर्बलता त्याच्या नाभीत लपलेली (Why did Ravana die after shooting an arrow in the navel) होती. याची माहिती फक्त त्याच्या कुटुंबीयांनाच होती. चला तर मग जाणुन घेऊया रावणाचा वध करण्यासाठी श्री रामाला काय (What was the name of that arrow Dussehra) करावे लागले.

Dussehra 2022
का सोडले रावणाने प्राण
author img

By

Published : Sep 30, 2022, 6:59 PM IST

रावणाने त्याची बहीण शूर्पणखा आणि भाऊ कुंभकरण आणि विभीषण यांच्यासह ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. तिघांवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने तिघांनाही वरदान मागायला सांगितले. तेव्हा विभीषणाने ज्ञान मागितले, शूर्पणखाने सौंदर्य मागितले आणि कुंभकर्णाने निद्रावस्थेत लीन होण्यासाठी वरदान मागितले. पण रावणाने अमृत आणि ज्ञानाचे वरदान मागितले होते. त्याचा मृत्यू होऊ नये म्हणून त्याने आपल्या नाभीत अमृत (Why did Ravana die after shooting an arrow in the navel) ठेवले होते.

असे अध्यात्म रामायणातील ६.११.५३.५४ मध्ये संस्कृत श्लोकात नमूद केले आहे - उत्पत्स्यन्ति पुनः शीघ्रोमत्याह भगवानजः। नाभिदेशेअमृतं तस्य कुण्डलाकार संस्थितम्।। तच्छोषयानलास्त्रेण तस्य मृत्यततो भवेत। विभीषण वचः श्रुत्वा रामः श्रुत्वा रामः शीघ्रपराकमः।। पावकास्त्रेण संयोज्य नाभिंविव्याध राक्षसः।

नाभीत होते मृत्यूचे गुढ : राम-रावण युद्ध शेवटच्या क्षणी पोहोचल्यावर श्रीरामांनी रावणावर बाणांचा वर्षाव केला. मात्र त्याचे डोके व हात कापल्यानंतरही ते पुन्हा जोडल्या जात होते. त्याचा वध कसा करायचा या चिंतेत श्रीराम पडले. तेव्हा विभीषण म्हणाला की हे रामा, ब्रह्माजींनी त्याला वरदान दिले आहे. यामुळे रावणाचे अवयव वारंवार कापूनही परत जोडल्या जात आहे. तेव्हा रावणाच्या नाभीत जे अमृत आहे. ते अग्निशस्त्राने तेथुन संपन्न करा, तरच त्याचा मृत्यू शक्य आहे. विभीषणाचे हे ऐकून रामानेही तसेच केले आणि रावणाच्या नाभीवर (What was the name of that arrow Dussehra) बाण मारला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

ब्रह्मास्त्राने केला रावणाचा घात : रावण कोणत्याही शस्त्राने मरत नव्हता. तेव्हा विभीषणाने रामाच्या कानात सांगितले की, ब्रह्मदेवाने रावणाला ब्रह्मास्त्र दिले आहे आणि त्याला त्या शस्त्रानेच मारता येईल. ते शस्त्र मंदोदरीच्या कोठडीत लपलेले आहे आणि त्याशिवाय हे युद्ध अनंतकाळ चालणार आहे. हनुमान ताबडतोब वृद्ध ब्राह्मणाच्या वेशात मंदोदरीला पोहोचले. ब्राह्मणाला पाहून ती प्रसन्न झाली. ती त्याचे स्वागत करू लागली. तेव्हा ब्राह्मणवस्त्रधारी हनुमानाने मंदोदरीला सांगितले की, विभीषणाने रामाला रहस्य सांगितले आहे की, तुझ्या खोलीत ठेवलेल्या दैवी शस्त्रानेच रावणाचा वध होईल.

हनुमानजी आपल्या प्रत्यक्ष रूपात आले : हनुमान म्हणाले की आई तू ते शस्त्र कुठेतरी लपवून ठेव. हे ऐकून मंदोदरी घाबरली आणि तिने ताबडतोब शस्त्र लपवून ठेवलेल्या ठिकाणी धाव घेतली. तेव्हा हनुमानजी आपल्या प्रत्यक्ष रूपात आले आणि त्यांनी ते दैवी शस्त्र मंदोदरीकडून हिसकावून घेतले आणि मंदोदरीला रडत रडत सोडून उडून गेले, असे एका आख्यायिकेत सांगितले आहे. हनुमानजी ब्रह्मास्त्र घेऊन श्री रामाकडे आले. त्यानंतर रामाने विजयादशमी च्या दिवशी त्याच बाणाने रावणाच्या नाभीवर निशाणा साधुन रावणाचा वध केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.