जिनिवा : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतात सर्वात पहिल्यांदा मिळालेल्या कोरोना स्ट्रेनचे नामकरण केले आहे. बी.1.617.1 आणि बी.1.617.2 या दोन स्ट्रेन्सना अनुक्रमे 'काप्पा' आणि 'डेल्टा' अशी नावं देण्यात आली आहेत. सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. या नावांसाठी यूनानी लिपीतील अक्षरांची मदत घेतल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले.
डब्ल्यूएचओच्या कोविड-१९ टेक्निकल प्रमुख डॉ. मारिया वान केरखोव यांनी ट्विट करत याबाबत सांगितले. या स्ट्रेन्सना सहजपणे ओळखता यावे यासाठी ही नावे ठेवण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. तर, या स्ट्रेन्सच्या वैज्ञानिक नावांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डब्ल्यूएचओने सांगितले, की या विषाणूच्या विविध स्ट्रेन्सबाबत चर्चा करताना वा माहिती देताना मदत व्हावी यासाठी त्यांची नावे ठेवली जातात. यासाठी अल्फा, बीटा, गॅमा अशा यूनानी लिपीतील अक्षरांची मदत घेण्यात येते. असे केल्यामुळे सामान्य लोकांनाही विषाणूच्या स्ट्रेन्समध्ये फरक करणे सोप्पे जाते. त्यामुळे, त्यांना याबाबत माहिती मिळवताना कोणतीही अडचण येत नाही.
हेही वाचा : जगातील सर्वात उंचीवर असलेल्या गावाचे झाले पूर्ण लसीकरण!