ETV Bharat / bharat

Arpita Mukherjee : 20 कोटींचे घबाड जिच्या घरी सापडले ती अर्पिता मुखर्जी आहे तरी कोण?

पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याची ईडीकडून ( who is arpita mukherjee ) चौकशी सुरू आहे. ही चौकशी आता थेट त्रिनमुल सरकारच्या मंत्र्यापर्यंत पोहचली आहे. माजी शिक्षण मंत्री तसेच सध्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळची मानली जाणारी अर्पिता मुखर्जी ( Arpita mukherjee house 20 crore cash ) हिची ईडीकडून चौकशी सुरू आहे. अर्पिता हिचा मंत्री पार्थ चॅटर्जी ( Arpita mukherjee house ed raid ) यांच्याशी काय संबंध आहे? त्या चॅटर्जी यांच्या जवळच्या का मानल्या जातात? हे प्रश्न उपस्थित होत आहे.

arpita mukherjee house ed raid
अर्पिता मुखर्जी ईडी चौकशी
author img

By

Published : Jul 23, 2022, 11:56 AM IST

Updated : Jul 23, 2022, 1:02 PM IST

हैदराबाद - पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याची ईडीकडून ( who is arpita mukherjee ) चौकशी सुरू आहे. ही चौकशी आता थेट त्रिनमुल सरकारच्या मंत्र्यापर्यंत पोहचली आहे. माजी शिक्षण मंत्री तसेच सध्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळची मानली जाणारी अर्पिता मुखर्जी हिची ईडीकडून चौकशी सुरू आहे. अर्पिताच्या ( Arpita mukherjee house 20 crore cash ) घरी ईडीने छापा टाकला तेव्हा त्यांना 20 कोटी रुपये रोख आढळून आले होते. पार्थ चॅटर्जी यांची देखील कालपासून या घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. दोघेही चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून आता विविध प्रश्न पुढे येत आहेत. त्यात प्रामुख्याने अभिनेत्री अर्पिता ( Arpita mukherjee house ed raid ) हिचा मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याशी काय संबंध आहे? त्या चॅटर्जी यांच्या जवळच्या का मानल्या जातात? हे प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा - UP Tiger Resque : नदीच्या भोवऱ्यात अडकलेल्या वाघाला जीवदान मिळाले

कोण आहे अभिनेत्री अर्पिता मुखर्जी ? - अर्पिता मुखर्जी ही अभिनेत्री असून तिने बंगाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. मात्र, चित्रपट जगतातील तिचा प्रवास हा अल्प आहे. बंगाली चित्रपटांबरोबरच तिने तामिळ आणि ओडिया चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीत अधिकतर साईड रोल केले आहेत. अर्पिताने बंगाली चित्रपट अमर अंतरनाडमध्ये अभिनय केले आहे. मात्र, तिच्या घरी ईडीच्या छाप्यात 20 कोटी सापडल्यानंतर ती सध्या चर्चेत आहे. शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान या प्रकरणात तिचा सहभाग असल्याचे पुढे आल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.

पार्थ चॅटर्जीशी काय संबंध? - अर्पित मुखर्जी या बंगाल सरकारमधील मंत्री आणि माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळची समजली जाते. मात्र, चॅटर्जी यांच्याशी तिची ओळख कशी काय झाली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, चॅटर्जी हे दक्षिण कोलकातातील लोकप्रिय नकटला उदयन या दुर्गा पूजा उत्सव समितीचे संचालन करतात. अर्पिता मुखर्जी 2019 आणि 2020 मध्ये चॅटर्जी यांच्या दुर्गा पूजा समारोहात सहभागी झाली होती.

भाजप नेत्याने ट्विट केले फोटो - अर्पिता मुखर्जीच्या घरी छापा पडल्यानंतर बंगाल विधानसभेचे विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी ट्विटरवर या संबंधी काही फोटो ट्विट केली आहे. ज्यात नकटला उदयन संघच्या दुर्गा पूजा उत्सवात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मंत्री पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी दिसून येत आहे. या फोटोद्वारे अर्पिता आणि तिची मंत्र्यांंशी जवळीकता दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचे जाणवते. दरम्यान टीएमसीने या पैशांशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तपासात ज्यांचे नाव समोर आले आहेत, ते उत्तर देतील. वेळ आल्यावर उत्तर देणार, असे त्रिनमूलकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - Gangrape At Delhi Railway Station : राजधानी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, चार रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

Last Updated : Jul 23, 2022, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.