ETV Bharat / bharat

Magh Purnima 2023 : माघ पौर्णिमेला कशी पूजा करावी, वाचा सविस्तर माहिती - Magh Purnima

हिंदू परंपरेनुसार 'माघ पौर्णिमा' हा धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा दिवस आहे. चंद्र हा मन, शांती, शीतलता, अध्यात्म इत्यादींचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला खूप महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी नदीत पवित्र स्नान, त्रिवेणी संगम, तीर्थयात्रा आदींसोबत देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी पूजा व दान करावे, अशी मान्यता आहे.

माघ पौर्णिमा
Magh Purnima 2023
author img

By

Published : Jan 23, 2023, 4:18 PM IST

Updated : Feb 5, 2023, 6:17 AM IST

माघ महिना हा हिंदू दिनदर्शिकेतील महत्त्वाचा महिना आहे. लोक माघी पौर्णिमेचा उपवास करतात, पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. या दिवशी गंगा, यमुना, कावेरी आणि इतर नद्यांमध्ये पवित्र स्नान केले जाते. माघ महिन्याची पौर्णिमा तिथीही विशेष मानली जाते. माघ महिन्याच्या शेवटच्या तारखेला 'माघी पौर्णिमा' म्हणतात. पूजेच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याची पौर्णिमा विशेष मानली जात असली तरी, माघ महिन्याच्या पौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी देवता पृथ्वीच्या दर्शनाला येतात, अशी धार्मिक मान्यता आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णू गंगा नदीत निवास करतात. अनेक अनुयायांचा असा विश्वास आहे की, या दिवशी प्रार्थना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. या प्रसंगी माघ मेळा देखील भरतो जो एक मोठा धार्मिक सण आहे. ही जत्रा दरवर्षी गंगा, यमुना आणि उत्तर भारतातील प्रसिद्ध सरस्वती नदीच्या संगमाजवळ (अलाहाबाद आणि प्रयाग सारखी शहरे) इथे भरते.

तारीख, दिवस आणि वेळ : हिंदू कॅलेंडर 2023 नुसार, माघ पौर्णिमा या वर्षी 5 फेब्रुवारी रोजी आहे. तर 4 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 09:29 वाजता पासुन सुरू होईल आणि 5 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11:58 वाजता समाप्त होईल. माघ पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर गंगास्नान करावे. गंगेत स्नान करणे शक्य नसेल तर, गंगेचे पाणी पाण्यात मिसळून स्नान करू शकता. स्नानानंतर ओम नमो नारायणाय मंत्राचा जप करताना सूर्य देवाला अर्घ्य द्यावे. नंतर सूर्यासमोर उभे राहून श्रद्धांजली अर्पण करा आणि पाण्यात तीळ अर्पण करा. यानंतर पूजा सुरू करा. चरणामृत, पान, तीळ, कुंकुम, फळे, फुले, पंचगव्य, सुपारी, दुर्वा इत्यादी अर्पण करा. शेवटी आरती करून प्रार्थना करावी. पौर्णिमेला चंद्र आणि धनाची देवी माता लक्ष्मीची पूजा करावी.

असे व्रत करावे : माघ पौर्णिमेला पहिला आणि सर्वात महत्वाचा विधी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी पवित्र नदीत पवित्र स्नान करणे. पवित्र नदीत स्नान केल्यानंतर भगवान विष्णू आणि भगवान हनुमान यांची त्यांच्या प्रमुख देवतेसह पूजा केली जाते. भगवान विष्णूचे उपासक 'सत्यनारायण' व्रत ठेवतात. उपवास करणार्‍यांनी परमेश्वराला अर्पण करण्यासाठी पवित्र राहुन नैवेद्य तयार करावे आणि नंतर 'सत्यनारायण कथा' म्हणटली जाईल. याशिवाय सत्यनारायण पूजा करून फळे, सुपारी, केळीची पाने, मोळी, तीळ, अगरबत्ती आणि चंदन भगवान विष्णूला अर्पण करावे. रात्रीच्या विधींमध्ये चंद्र देवाला 'अर्घ्य' अर्पण करण्याची धार्मिक प्रथा समाविष्ट आहे. २०२३ माघ पौर्णिमेला तुम्ही रामायण आणि भगवद्गीता पठण देखील करू शकता. असे केल्याने पुण्य मिळते. याशिवाय ‘अन्न दान’ला खूप महत्त्व आहे. या दिवशी अनेक दानधर्म करण्याचे महत्त्व आहे. माघ महिन्यात दान करायला सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे तीळ. जे तुम्ही चांगले फळ मिळावे म्हणून दान करावे.

Last Updated : Feb 5, 2023, 6:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.