ETV Bharat / bharat

भारतात 71 लाखांहून अधिक व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंद; करू नका 'या' चुका - Whatsapp banned

Whatsapp : 2023 मध्ये बऱ्याच स्कॅमर्सनी व्हॉट्सअ‍ॅप वापरून लोकांना फसवलंय. या ऑनलाइन घोटाळ्यांची प्रकरणे इतकी टोकाला पोहोचली की भारत सरकारलाही हस्तक्षेप करावा लागला आणि कंपनीला कारवाई करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने मोठी कारवाई केली. महिन्यात भारतातील एकूण 71 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली.

Whatsapp banned 71 lakh accounts in india
भारतात 71 लाखांहून अधिक व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 1:07 PM IST

हैदराबाद : सोशल मीडिया कंपनी व्हॉट्सअ‍ॅपनं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 71 लाखांहून अधिक भारतीय अकाउंटस् बंद केली आहेत. कंपनीनं IT नियम 2021 अंतर्गत ही कारवाई केली आहे. या नियमानुसार सर्व मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला यूजर सेफ्टी रिपोर्ट जारी करावा लागतो. याशिवाय तक्रारी आणि त्यांच्यावर केलेली कारवाईही नमूद करावी लागेल. गेल्या वर्षी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान कंपनीनं भारतातील 71 लाख 96,000 अकाउंटस् बंद केली आहेत. यापैकी 19 लाख 54,000 अकाउंट कंपनीने स्वत:च्या देखरेखीखाली कोणतीही तक्रार न करता बॅन केली आहेत.

नोव्हेंबर महिन्यात 'इतक्या' तक्रारी आल्या : नोव्हेंबर महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपवर ८,८४१ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी ६ तक्रारींवर कंपनीने कारवाई केली. कंपनी दर महिन्याला वापरकर्ता सुरक्षा अहवाल जारी करते. जर तुम्ही तुमचे खाते WhatsApp च्या नियम आणि अटींनुसार ऑपरेट केले नाही तर तुमचे खाते देखील बॅन केले जाऊ शकते. जर तुम्ही नग्नता, घोटाळा, फसवणूक, चोरी, देशाविरोधातील कोणत्याही प्रकारच्या कारवायांमध्ये गुंतले असाल तर कंपनी कधीही तुमचे खाते बंद करू शकते.

व्हॉट्सअ‍ॅपने यूजर्सच्या सुरक्षेसाठी नवीन फीचर्स जारी केलं : मागील वर्षी व्हॉट्सअ‍ॅपनं वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी अ‍ॅपमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत, ज्यात चॅट लॉक, ईमेल अॅड्रेस लिंक, पासकी इ. तुम्ही अजून तुमचा ईमेल आयडी तुमच्या WhatsApp खात्याशी लिंक केला नसेल, तर तो नक्कीच लिंक करा. असं केल्यानं तुम्ही ईमेलद्वारेही तुमच्या खात्यात लॉगिन करू शकाल. याशिवाय 'पास-की' देखील सेट करण्यास विसरू नका. हे तुम्हाला फिंगरप्रिंटद्वारे तुमचे खाते सत्यापित करण्यास अनुमती देते ज्यामुळे खात्याची सुरक्षा वाढते.

WhatsApp च्या अनधिकृत आवृत्तीचा वापर : जर तुम्ही देखील असा विचार करत असाल की व्हॉट्सअ‍ॅपची अनधिकृत आवृत्ती वापरणं योग्य आहे, तर एक दिवस तुम्ही ही मोठ्या अडचणीत येऊ शकता. तुम्ही कदाचित GB WhatsApp, WhatsApp Plus, WhatsApp Go, WhatsApp Prime आणि OG WhatsApp, वगैरे अ‍ॅप्सविषयी कदाचित ऐकलं असेल. हे सर्व अ‍ॅप्स वापरण्याच्या प्रलोभनाला चुकूनही बळी पडू नका.

धमकी देणारी आणि बेकायदेशीर सामग्री पाठवणं : व्हॉट्सअ‍ॅपच्या अनधिकृत आवृत्तीशिवाय तुम्ही जर व्हॉट्सअ‍ॅपवर बेकायदेशीर सामग्री शेअर केली, लोकांना धमकावले आणि आक्षेपार्ह मजकूर पाठवला, तर तुमच्यावर प्लॅटफॉर्मद्वारे बंदी घातली जाऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्येही ही माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. 2024 च्या सुट्ट्यांचे कॅलेंडर; शेअर बाजारात 14 दिवस सुट्टी
  2. तुमचा यूपीआय (UPI) आयडी बंद होईल का? सरकारने दिली ३१ डिसेंबरपर्यंत मुदत
  3. नवं वर्ष, नवं मिशन! नवर्षाच्या पहिल्याच दिवशी 'इस्रो'नं 'हा' रचला रचला इतिहास, 'कृष्णविवरा'ची उलगडणार रहस्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.