ETV Bharat / bharat

Akash Missile Strength : शत्रूला 'अस्मान' दाखवणारं आकाश मिसाईल होतं तरी काय? यामुळेच हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले कुरुलकर?

पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे संचालक शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. हनीट्रॅपमध्ये अडकून त्यांनी पाकिस्तानला मिसाईल संदर्भातील माहिती दिल्याचा संशय असल्याने त्यांना अटक झाली आहे. आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते.

Akash Missile
Akash Missile
author img

By

Published : May 5, 2023, 10:17 PM IST

हैदराबाद : देशातील सर्वात मोठ्य़ा संरक्षण संशोधन संस्थेच्या संचालक पदी असताना कुरुलकर हनी ट्रॅपच्या जाळ्यात कसे अडकले? कुरुलकर यांना का टार्गेट करण्यात आले? असे प्रश्न तुमच्या-आमच्या मनात येत आहेत. वाचक मित्रांनो, आपण या लेखात अगदी साध्या आणि सोप्या भाषेत हे प्रकरण समजून घेणार आहोत. तसेच शत्रूला आस्मान दाखवण्याची शक्यता असलेल्या मिसाईलबाबत जाणून घेणार आहोत.

का झाली अटक : एटीएसनुसार, पुण्यातील डीआरडीओचे संचालक शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅप प्रकरणात अटक करण्यात आली आहे. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, कुरुलकर हे व्हॉट्सअॅप आणि व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर कार्यकर्त्यांशी संपर्कात होते. त्यांनी त्याद्वारे पाकिस्तानला भारताविषयी संवेदनशील माहिती दिली आहे. यामुळे देशाच्या संरक्षणाला धोका उत्पन्न झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुरुलकर हे एका महिलेल्या संपर्कात होते. ते हनी ट्रॅपमध्ये अडकले असून त्यांनी आपल्या वैयक्तिक फोटोंसह काही मिसाईल कोठे आहेत याची अचूक माहिती पाकिस्तानला दिली असल्याचे एटीएस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

कोण होते शास्त्रज्ञ कुरुलकर : शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), अभियांत्रिकी प्रयोगशाळेचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदीप कुरुलकर यांचा जन्म 1963 झाली झाला होता. त्यांनी 1985 मध्ये COEP पुणे येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून प्रथम वर्गातून पदवी उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर 1988 मध्ये DRDO साठी CVRDE, आवाडी येथे आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर कुरुलकर यांनी आयआयटी कानपूरमधून पॉवर इलेक्ट्रॉनिक्समधील ड्राईव्ह आणि एप्लिकेशन्समधील शिक्षण घेतलं.

का आहेत होते टार्गेट : क्षेपणास्त्र म्हणजेच मिसाईलची रचना आणि विकास, लष्करी अभियांत्रिकी गिअर, अत्याधुनिक रोबोट्क्सिमध्ये त्यांचे कौशल्य आहे. कुरुलकर हे एक उच्च-प्रोफाइल शास्त्रज्ञ असून ते डीआरडीओच्या अनेक संवेदनशील ऑपरेशन्समध्ये सामील होते. कुरुलकर यांनी मिसाईल लॉन्चिंग केले आहेत. तीन दशकापेक्षा जास्त काळ त्यांनी डीआरडीओमध्ये काम केले आहे.

हे आहेत त्यांचे कौशल्य : क्षेपणास्त्र म्हणजेच मिसाईलची रचना आणि विकास, लष्करी अभियांत्रिकी गिअर, अत्याधुनिक रोबोट्क्सि आणि लष्करी अनुप्रयोगांसाठी मोबाइल मानवरहित प्रणालीत काम करणे हे त्यांचे कौशल्य आहे. कुरुलकर यांनी हायपरबेरिक चेंबर, मोबाईल पॉवर सप्लाय आणि हाय-प्रेशर न्यूमॅटिक सिस्टीम यांसारख्या लष्करी अभियांत्रिकी प्रणाली आणि उपकरणांच्या डिझाइन, विकास आणि वितरणामध्ये एक प्रमुख आणि प्रमुख डिझायनर म्हणून महत्त्वपूर्ण काम केले आहे. एक टीम लीडर आणि लीड डिझायनर म्हणून, कुरुलकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. AD, MRSAM, निर्भय सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र प्रणाली, प्रहार, QRSAM आणि XRSAM साठी क्षेपणास्त्र लॉन्चिंगसाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

शत्रूला अस्मान दाखवणाऱ्या 'आकाश'चे निर्माते : प्रदीप कुरुलकर हे आयएसआयच्या टार्गेट असण्याचे अजून एक कारण म्हणजे आकाश ग्राउंड सिस्टम्सेचे प्रोजेक्ट प्रमुख होते. शिवाय त्यांनी सिस्टम मॅनेजर म्हणून ते आकाश टीमचे प्रमुख सदस्य आहेत. कुरुलकर यांनी आकाश लॉचर्स आणि मिशन क्रिटिकल ग्राउंड सिस्टम्सच्या डिझाइन, विकास आणि उत्पादनामध्ये प्रमुख भूमिका बजावली आहे.

धोका झाला निर्माण : आकाश लाँचर्स आणि इतर ग्राउंड सिस्टम्ससाठी एक हजार कोटींच्या उत्पादन ऑर्डर जारी करण्यात आली आहे. अशात कुरुलकर हे हनी ट्रॅपमध्ये अडकल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. एटीएसच्या अधिकाऱ्याच्या मते, कुरुलकर यांनी मिसाईलच्या ठिकाणांची माहिती दिली आहे, यामुळे धोका अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे आकाशची ताकद : आकाश क्षेपणास्त्र हे अत्याधुनिक स्वदेशी क्षेपणास्त्र आहे ज्यात जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता आहे. या क्षेपणास्त्रात केवळ लक्ष्य भेदण्याची क्षमताच चांगली आहेच शिवाय उत्तम नियंत्रणासाठी ग्राउंड लाँचरही तयार करण्यात आले आहे. एकदा लॉन्च केल्यानंतर ही मिसाईल अनेक ठिकाणी टार्गेट करू शकते. आकाश प्राइमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्र आहे.

भारत डायनॅमिक्स लिमिटेडद्वारे निर्मित : आकाश मिसाईल हे 4 हजार 500 मीटर उंचीवर तैनात करण्यात केले जाऊ शकते. म्हणजे साधारण 25 ते 30 किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करू शकते. आकाश हे सध्या जगातील सर्वात स्वस्त सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांपैकी म्हणजेच एक आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनद्वारे डिझाइन केलेले आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडद्वारे निर्मित करण्यात आले आहे. आकाश मिसाईल हे भारतीय लष्कर आणि हवाई दलात समाविष्ट केलेल्या सर्वात यशस्वी स्वदेशी क्षेपणास्त्रांपैकी एक आहे.

  • इन्फो ग्राफिक्स -
  1. शत्रूलाला अस्मान दाखवणारे आकाश मिसाईलची शक्ती
  2. आकाश क्षेपणास्त्राच्या प्रगत आवृत्तीच्या प्राइमची जैसलमेरच्या पोखरण फील्ड फायरिंग रेंजवर यशस्वी चाचणी झाली होती.
  3. या क्षेपणास्त्राची रेंज आकाशात ३० किलोमीटरपर्यंत आहे.
  4. एकावेळी ६० किलोपर्यंतचे पेलोड वाहून नेऊ शकते.
  5. हे क्षेपणास्त्र हवेतही नियंत्रित केले जाऊ शकते आणि सेन्सरच्या माध्यमातून ड्रोनपासून लढाऊ विमानांपर्यंतही लक्ष्य करू शकते.
  6. आकाश प्राइम हे ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रे, हवेतून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपर्यंत उंचावर उडणारी लढाऊ विमाने सहज भेदण्यास सक्षम

मिसाईलचा विकास,इतिहास : मार्क-1 आकाश क्षेपणास्त्राची पहिली चाचणी उड्डाण 1990 मध्ये घेण्यात आली होती. तसेच त्याचे विकास, उड्डाणे मार्च 1997 पर्यंत सुरू होते.

  • हेही वाचा -
  1. Amruta Fadnavis On Ajit Pawar अजित पवारांचे मुख्यमंत्री पदाबाबत विधान अमृता फडणवीस थेटच म्हणाल्यापाहा व्हिडिओ
  2. Sharad Pawar Retirement शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय अचानक घेतला नाही विठ्ठलशेठ मणियार
  3. Thorat on Pawar शरद पवार यांना बाजूला जाऊन चालणार नाही थोरात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.