ETV Bharat / bharat

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या, कसा असेल हा आठवडा - प्रेमिकेस विवाहाची मागणी

जुलैचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. मेष राशीशी विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल, अन्यथा त्रास होऊ शकतो. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. कर्क राशीशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. प्रेम जीवनात चढ-उतार येतील.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य
author img

By

Published : Jul 15, 2023, 9:57 PM IST

Updated : Jul 16, 2023, 6:29 AM IST

मेष : आठवड्याच्या सुरूवातीस आपणास मित्रांसह मौज मजा करण्याची संधी मिळेल. त्यांच्यासह बाहेर फिरावयास जाल. जुन्या आठवणी ताज्या झाल्याने मन प्रसन्न होईल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करून मार्गक्रमण करतील. प्रणयी जीवनात रोमांससह वाद होण्याची संभावना सुद्धा आहे. काहीशी आंबट गोड परिस्थिती निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असली तरी कोणाशी वाद होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणत्याही महिलेच्या विरुद्ध अपमानजनक शब्दांचा वापर करू नये, अन्यथा अडचणीत सापडावे लागू शकते. व्यापारात उत्तम यश प्राप्ती होईल. आपले प्रयत्न यशस्वी होऊन आपणास काही अनपेक्षित फायदा सुद्धा होईल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल, अन्यथा त्रास होऊ शकतो. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. जुन्या विकारातून बहुतांशी मुक्ती मिळेल. आठवड्याचे सुरूवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृषभ : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश व रोमँटिक असलेले दिसतील. एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्यात यशस्वी व्हाल. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेशी जवळीक साधतील व त्यामुळे त्यांचे नाते अधिक मधुर होईल. कार्यक्षेत्री मोठे यश प्राप्त होईल. ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना जास्त फायदा होईल. व्यापारी आपल्या व्यापारवृद्धीसाठी काही नवीन प्रयोग करतील, व त्यामुळे त्यांना चांगला लाभ होईल. ते स्वतःसाठी नवीन कार्यालय बनवू शकतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी खूपच छान आहे. त्यांची मेहनत यशस्वी होईल. ते अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आहारावर सुद्धा नियंत्रण ठेवावे. असंतुलित आहाराने आपली प्रकृती बिघडू शकते. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात माधुर्य निर्माण होईल. एकमेकात उत्तम समन्वय साधला गेल्याने आपण आपले वैवाहिक जीवन अधिक सुखद करू शकाल. जोडीदाराचे सुद्धा सहकार्य मिळेल. इतकेच नव्हे तर जोडीदार आपणास प्रगतीसाठी प्रेरित सुद्धा करेल. विवाहितांना संतती प्राप्ती होऊ शकते. प्रणयी जीवनासाठी आठवडा सामान्य आहे. आपण आपल्या प्रेमिकेस विवाहाची मागणी घालू शकता. आपली पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली कामे बिघडू नयेत म्हणून मानसिक तणाव दूर करण्याचा प्रयत्न करावा. आपले नशीब प्रबळ असल्याने आपणास कमी श्रमात जास्त यश मिळेल. हा आठवडा नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी अनुकूल आहे. आपण आपल्या अनुभवाच्या व कौशल्याच्या जोरावर नोकरीत फायदा मिळवू शकाल. व्यापाऱ्यांना बाजारातून चांगला परतावा मिळेल. त्यांना तज्ञ व्यक्तीं बरोबर काम करण्याची संधी मिळेल. त्यांचा सल्ला आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करावा लागेल. त्यांचा आत्मविश्वास उत्तम असल्याचा त्यांना फायदा होईल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती साधारणच राहील. असे असले तरी आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कर्क : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. वैवाहिक जीवनात शांतता नांदेल. एकमेकात उत्तम समन्वय साधला जाईल. प्रणयी जीवनासाठी मात्र आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपसात वाद होण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात आपल्या योजना एखाद्याला सांगितल्यास ती व्यक्ती त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. परदेश प्रवास संभवतो. खर्च बरेच होतील, मात्र हे खर्च योग्य कारणांसाठीच झाल्यामुळे आपले समाधान सुद्धा होईल. आपले मन व बुद्धी जलद गतीने काम करेल. जे काम इतरांना अवघड वाटेल ते आपण सहजपणे करू शकाल. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी व व्यापारात आपली कामगिरी उंचावण्यात आपण यशस्वी व्हाल. सर्व कामे चांगली झाल्याने आपल्या मनाचे समाधान होईल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर प्रवृत्तींकडेसुद्धा लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे ते आपल्यात खूप सुधारणा करू शकतील. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. आहारावर मात्र नियंत्रण ठेवावे. तेलकट व मसालेदार पदार्थ आहारात घेणे टाळावे. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

सिंह : हा आठवडा आपल्यासाठी आनंदात नावीन्य घेऊन येणारा आहे. दांपत्य जीवनातील समस्या दूर होतील. नात्यात प्रेम व आकर्षणा व्यतिरिक्त एकमेकांना बरोबरीची वागणूक देण्याच्या प्रयत्नामुळे आपल्या नात्यात सुधारणा होईल. ह्या आठवड्यात प्रणयी जीवन चढ - उताराने भरलेले राहील. आपण व आपली प्रेमिका या दरम्यान अनेक गैरसमज असतील, जे दूर करण्यास थोडा वेळ लागू शकतो. तेव्हा धीर धरून वाटचाल करावी, तसेच प्रेमिकेस प्रत्येक गोष्ट खुलासेवार सांगावी. आपल्या प्राप्तीत मोठी वाढ होत असल्याचे दिसून आल्याने आपले मन खुश होईल. आपल्या खर्चात कपात होईल. त्यामुळे आपली मोठी चिंता दूर होईल. ईश्वर कृपेने आपली कामे होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची स्थिती मजबूत होईल. त्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. हा आठवडा व्यापारासाठी अनुकूल आहे. काही नवीन लोकांना भेटून काम केल्यास आपणास लाभ होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. त्यांना उच्च शिक्षणात मोठे यश मिळू शकते. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक कोणताही त्रास होताना दिसत नाही. मात्र, आपल्या दिनचर्येत नियमितता राखावी. आठवड्याचे सुरूवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कन्या : हा आठवडा आपल्यासाठी थोडा आव्हानात्मक आहे. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात तणावाच्या जोडीने प्रेम असल्याचे सुद्धा जाणवेल. त्यामुळे त्यांचे नाते आंबट - गोड वादाने वाटचाल करेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा मध्यम फलदायी आहे. आपणास आपल्या प्रेमिकेच्या भावनांचा आदर करावा लागेल. बरीचशी कामे वेळेवर करणे आपल्यासाठी चिंतेचा विषय होऊ शकतो. त्यामुळे आपण काहीसे भांबावलेले दिसू शकता. तसेच एकाच वेळी अनेक कामे उरकल्यामुळे आपली बरीचशी ऊर्जा सुद्धा खर्च होईल. त्याचे योग्य प्रकारे जतन करणे आपल्यासाठी गरजेचे ठरेल. आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा आपणास समस्यांना सामोरे जावे लागण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती खूप मेहनत करतील, परंतु काही ना काही कारणाने त्यांच्या कामात चुका होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना अनेक दिवसां पासून प्रतिक्षीत असलेल्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचा पाठिंबा मिळू शकतो. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. त्यांना एखादे चांगले यश सुद्धा प्राप्त होऊ शकते. त्यांनी मिळालेल्या संधीचा सदुपयोग करावा. स्पर्धेत सुद्धा चांगले यश मिळू शकते. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तणावामुळे त्रास संभवतो. तेव्हा त्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आठवड्याचे सुरूवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

तूळ : ह्या आठवड्यात आपण अत्यंत व्यग्र राहाल. वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण एकमेकांना उत्तम सहकार्य कराल. प्रणयी जीवनासाठी आठवडा आंबट - गोड असा आहे. नात्यात प्रेम असले तरी थोडे वाद होण्याची संभावना आहे. आपण आपल्या कामात खूप मेहनत कराल. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा आपण खूप कार्यरत असल्याचे दिसून येईल. आपली सर्व कामे आपण वेळेवर पूर्ण करू शकाल व त्यामुळे आपली प्रतिमा उंचावेल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना एखादी मोठी संधी मिळू शकते. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी आपली ओळख होईल. आर्थिक लाभ होतील. आपणास आनंद व लाभ अशा दोघांची प्राप्ती होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चढ - उतारांचा आहे. असे असले तरी आपण वेळ काढून आपला अभ्यास करू शकाल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा मिश्र फलदायी आहे. आपणास आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्याचे सुरूवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे. आठवड्याच्या सुरूवातीस आपणास आपल्या सासुरवाडी कडील व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. आपला वैवाहिक जोडीदार आपल्या कामाने चिंतीत होईल. त्यामुळे आपल्यात काहीसे वाद संभवतात. मात्र, वैवाहिक जीवनातील वातावरण सकारात्मकच राहील. प्रेमीजनांसाठी आठवडा तितकासा अनुकूल नाही. आपल्या प्रेमिकेस भेटण्यात त्यांना अडचणी येतील, त्यामुळे ते चिंतीत होऊ शकतात. व्यापाऱ्यांना आपल्या योजनांचा पुनर्विचार करावा लागेल, अन्यथा त्यांच्या योजना स्थगित होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा चांगला आहे. ते मन लावून आपली कामे वेळेवर पूर्ण करतील. त्यांचे वरिष्ठ सुद्धा त्यांच्या कामगिरीने प्रभावित होतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. त्यांना स्पर्धेत यश मिळू शकते. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

धनु : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. संततीकडून सुख मिळेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन साधारणच असेल. जोडीदाराशी होणारे संभाव्य वाद टाळावे. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल असला तरी आपल्याला सुद्धा एक खाजगी जीवन असल्याचे, आपणास आपल्या प्रेमिकेस समजवावे लागेल. गरजे पेक्षा जास्त हस्तक्षेप आपल्यासाठी त्रासदायी ठरू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा व कोणालाही अपशब्द बोलू नका. आपसातील समन्वय उत्तम असल्यास कौटुंबिक वातावरण सुद्धा सकारात्मक राहील. व्यापारात आपणास मित्रांचे सहकार्य मिळू शकते. त्यामुळे आपला व्यवसाय उत्तम चालेल. हा आठवडा प्राप्तीच्या दृष्टीने सुद्धा अनुकूल आहे. आपणास एखादा मोठा लाभ होण्याची संभावना आहे. अचानकपणे लाभ झाल्यामुळे आपला आनंद गगनात मावणार नाही. नोकरीच्या ठिकाणी परिस्थितीत चढ - उतार येतील, तेव्हा लक्ष पूर्वक कामे करावीत. ह्या आठवड्यात आपले खर्च नियंत्रणात राहतील व प्राप्तीत वाढ होईल. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळेल. अभ्यासात सुद्धा त्यांची कामगिरी चांगली होईल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती चांगली राहील, परंतु तणावामुळे काहीसा त्रास होऊ शकतो. अशे वेळी तणाव दूर करण्याचा प्रयत्न करावा. योगासन व व्यायामासाठी वेळ काढावा. आठवड्याचा पहिला व अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.

मकर : हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा विवाह ठरण्याची संभावना आहे. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. वैवाहिक जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. आपसातील संबंधात वृद्धी होईल. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या मिश्र फलदायी आहे. एकीकडे आपणास आर्थिक चिंता सतावतील तर दुसरीकडे प्राप्तीत वाढ झाल्याने आपणास आनंद सुद्धा होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कामाचा आनंद उपभोगता येईल. नोकरीच्या ठिकाणी त्यांची परिस्थिती उंचावल्याने त्यांची कामगिरी चांगली होईल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल असल्याने त्यांनी त्याचा फायदा उचलावा. एखादा नवीन व्यापारी सौदा सुद्धा करू शकता. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा प्रतिकूल परिणाम येऊ शकतात. ह्या आठवड्यात आपणास आरोग्य विषयक समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा आपण आजारी पडण्याची संभावना आहे. आठवड्याचा अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.

कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या जवाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडू शकाल. संतती संबंधी काळजी सुद्धा दूर होईल. प्रेमीजनांना आपल्या प्रेमिकेची मानसिक चिंता दूर करण्यासाठी तिच्या सोबत बसून बोलावे लागेल. असे केल्याने तिला आराम वाटेल व त्यामुळे आपणास आपल्या नात्यातील आनंद मिळू शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा चढ - उताराने भरलेला आहे. आपण नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. व्यापारात यशस्वी होण्याची संधी मिळेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. त्यांना चांगले परिणाम व यश प्राप्त होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे. आरोग्य विषयक कोणतीही समस्या उदभवेल असे दिसत नाही. असे असले तरी आपल्या दिनचर्येत नियमितता राखावी. आठवड्याचा पहिला दिवस प्रवासास अनुकूल आहे.

मीन : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपल्या वैवाहिक जीवनाकडे लक्ष देऊन आपल्या जोडीदारास खुश ठेवाल. प्रेमीजनांना आनंदाचे क्षण उपभोगता येतील. आपल्या प्रेमिकेला खुश करण्यासाठी आपण तिला एखादी मोठी भेटवस्तू द्याल. आपण आपल्या कौटुंबिक जवाबदाऱ्या पूर्ण कराल. मन प्रसन्न राहील. सर्वांशी मिळून मिसळून संवाद साधाल. मित्रांशी गप्पा गोष्टी करण्याची संधी मिळेल. आपसातील संबंध दृढ होतील. आठवड्याच्या सुरूवातीस आपले लक्ष आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यावर राहील. ह्या व्यतिरिक्त पैसा कमावण्यावर सुद्धा आपले लक्ष केंद्रित होईल. आपली बँकेतील गंगाजळी सुद्धा वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामात यश प्राप्त होईल. विरोधकांपासून थोडे सावध राहावे. व्यापाऱ्यांना निव्वळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कर चोरी टाळावी. त्यामुळे आपलाच फायदा होईल व आपण अडचणीत येऊ शकणार नाहीत. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. लक्ष विचलित करणाऱ्या घटनांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास करावा. ह्या आठवड्यात आपली प्रकृती चांगली राहील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

Last Updated : Jul 16, 2023, 6:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.