नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण उत्तर भारतात पावसाने धुमाकूळ घातला आहे. दिल्लीशिवाय पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांना पुराचा फटका बसला आहे. यमुना, ब्रह्मपुत्रा यासह अनेक नद्यांना उधाण आले आहे. दिल्ली आणि आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. मात्र, महाराष्ट्रात कुठे हलका तर कुठे मुसळधार असा पाऊस सर्वत्र पडत आहे.
मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे 16 जुलैनंतर पावसाचा जोर वाढणार आहे, असे हवामान खात्याने आपल्या पाच दिवसांच्या अंदाजात म्हटले आहे. तसेच 18 जुलैपर्यंत महाराष्ट्राच्या कोकण विभागाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या दरम्यान परिसरातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात, असेही सांगितले. आगामी पावसामुळे भारतीय हवामान विभागाने कोकण-गोवा उपविभागाला रविवार, सोमवार आणि मंगळवारसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. भारतीय हवामान विभागाने आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ आणि वाशीम यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. आज राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
-
#WATCH | Yamuna River continues to overflow, nearby areas and key roads remain affected due to waterlogging in Delhi.
— ANI (@ANI) July 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Visuals from Mathura Road, near Supreme Court area pic.twitter.com/jygOgVxnfL
">#WATCH | Yamuna River continues to overflow, nearby areas and key roads remain affected due to waterlogging in Delhi.
— ANI (@ANI) July 15, 2023
Visuals from Mathura Road, near Supreme Court area pic.twitter.com/jygOgVxnfL#WATCH | Yamuna River continues to overflow, nearby areas and key roads remain affected due to waterlogging in Delhi.
— ANI (@ANI) July 15, 2023
Visuals from Mathura Road, near Supreme Court area pic.twitter.com/jygOgVxnfL
दिल्ली आणि आसाममध्ये पूरस्थिती : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण भारत खराब हवामानाचा सामना करत आहे. आधी जूनमध्ये बिपरजॉय चक्रीवादळ, त्यानंतर पुराने आसाममध्ये धुमाकूळ घातला. दिल्लीत पावसाने 41 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. दिल्लीशिवाय पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांना पुराचा फटका बसला आहे. यमुना, ब्रह्मपुत्रा यासह अनेक नद्यांना उधाण आले आहे. दरम्यान, दिल्ली आणि आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाली असून, त्यामुळे लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
-
#WATCH | Severe water logging witnessed in parts of national capital after heavy rain lashes the city.
— ANI (@ANI) July 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Visuals from ITO. pic.twitter.com/QA8Cful5fv
">#WATCH | Severe water logging witnessed in parts of national capital after heavy rain lashes the city.
— ANI (@ANI) July 15, 2023
Visuals from ITO. pic.twitter.com/QA8Cful5fv#WATCH | Severe water logging witnessed in parts of national capital after heavy rain lashes the city.
— ANI (@ANI) July 15, 2023
Visuals from ITO. pic.twitter.com/QA8Cful5fv
यमुना नदीला पूर : दिल्लीमध्ये यमुना नदीला देखील पूर आलेला आहे. दिल्लीतील अनेक वसाहतींचे तलावात रूपांतर झाले आहे. पूरग्रस्त भागात वैद्यकीय शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. पंजाब आणि हरियाणामध्ये अतिवृष्टीमुळे पंजाबमधील 14 आणि हरियाणातील 13 जिल्हे प्रभावित झाले आहेत. पंजाबमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत 29 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर हरियाणामध्ये ही संख्या 26 आहे.
हेही वाचा :
- Monsoon rain Update : विदर्भाला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा, सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पाऊस
- Maharashtra Weather Update: बळीराजाला मोठा दिलासा; 'या' तारखेपासून मेघगर्जनेसह मान्सून धडकणार- हवामान खात्याचा अंदाज
- Maharashtra Weather Update Today: रेड अलर्ट असताना रत्नागिरीला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण ओव्हरफ्लो, सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट